Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : पेठरोड परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Nashik Crime : पेठरोड परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील पेठरोड फाटा परिसरातील (Peth Phata Area) एरंडवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर लगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची तपासणी केली.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर इसमाच्या डोक्यावर जबर मार लागला असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच प्रथम दर्शनी तो मजूर (laborer) असल्याचे दिसत असून त्याच्या हातावर शांतीलाला बरामाण असे नाव गोंदलेले दिसत आहे. तर पोलिसांना (Police) घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढळून आला आहे.

दरम्यान, घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढळून आल्याने दारू पिण्याच्या वादातून सदर इसमाचा घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तर घटनास्थळी पंचवटी पोलीसांनी (Panchavati Police) दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...