Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : सदनिका खरेदीतून गंडा; कुटुंबाकडून उकळले २१ लाख रुपये

Nashik Crime : सदनिका खरेदीतून गंडा; कुटुंबाकडून उकळले २१ लाख रुपये

दोघांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकाच सोसायटीतील (Society) दुसरी सद‌निका खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या कुटुंबास (Family) बनावट हरकत दाखला देत बिल्डरसह त्याच्या साथीदाराने २१ लाख रुपये उकळून गंडा घातला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) सदनिकाधारक भारती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित बिल्डर रिषी सुनीत कॉन्ट्रॅक्टर व अवनीत गुजराल (रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

भारती विजय पाटील (रा. फ्लॅट नं. ८, विश्वधारा हौ. सोसायटी, एबीबी सर्कलजवळ, महात्मानगर) यांचे पती जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, सन २०१६-१७ मध्ये बिल्डर रिषी सुनीत व इतरांनी एबीबी सर्कल येथे विश्वधारा सोसायटी या गृहप्रकल्पाचे निर्माण केले असून त्यात बहुतांश फ्लॅटची खरेदी व विक्री झाली आहे. याच सोसायटीत वास्तव्यास असताना भारती पाटील यांनी १७ क्रमांकाचा फ्लॅट खरेदी (Purchase) करण्याची इच्छा दर्शवली.

त्यानुसार त्यांनी रिषी व अवनीत गुजराल यांची भेट घेऊन एकूण १३०० चौ. फुटाचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५७ लाख २७ हजारांचा व्यवहार फायनल केला. यानंतर १३ जून २०१७ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात हस्तांतर करारनामा करण्यात आला. तेव्हा ही रक्कम, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी खर्च, जीएसटी असा ११ लाख ५८ हजारांचा खर्च केला. यानंतर दोघा संशयितांनी (Suspected) पाटील यांना ‘लवकरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतो, तुम्ही पैसे तयार ठेवा, आपण खरेदीखत करून सदनिकेचा ताबा देतो’ असे सांगितले.

दरम्यान, यानंतर वेळोवेळी संशयितांनी पाटील यांच्याकडून पैसे घेतले. असे असताना ३० जून २०२४ रोजी दोघे संशयित विश्वधारा सोसायटीचे सेक्रेटरी राजेंद्र भट यांच्याकडे आले. त्यांनी पाटील दाम्पत्यास बोलावून घेत अचानक ‘नवा फ्लॅट बांधणे शक्य नाही. झालेला करारनामा रद्द करून घेऊ, काहीतरी सेंटलमेंट करून घ्या’ असे म्हटले. त्यावेळी दाम्पत्याने नकार दिला असता दोघाही संशयितांनी त्यांना ‘तुम्ही सेटलमेंट केली नाही तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत शिवीगाळ केली.

असा झाला उलगडा

जुलै २०२४ मध्ये सोसायटीच्या सचिवांकडील पत्र दाम्पत्याने वाचले असता या गृहप्रकल्पात फ्लॅट नंबर १७ हा बांधण्यात येणारच नाही. त्यासाठी लागणारी कोणतीही मंजुरी नाही. तसेच या सदनिकेकरता केलेला ठराव व ना हरकत दाखला हा बनावट आहे, असे कळाले. याबाबत पाटील यांनी खात्री केली असता कुठलीही बांधीव मिळकत बांधणार नसल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, नवा फ्लॅट खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन देऊन दोघा संशयितांनी एकूण २१ लाख १८ हजार रुपये घेत फसवणूक केल्याचे भारती यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. तपास सुरू असून दोघांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...