Monday, October 14, 2024
Homeक्राईमNashik Crime News : मध्यवर्ती कारागृहात चोरट्यांकडून चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न; गुन्हा...

Nashik Crime News : मध्यवर्ती कारागृहात चोरट्यांकडून चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) चोरट्यांनी (Thieves) शिरकाव करुन चंदनाची झाडे (Sandalwood Tree) कापून चोरुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानातील चंदनही चोरुन नेण्यात आले होते. त्याचा तपास शून्य असतानाच आता चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या कारागृह परिसरातच चोरी झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धडाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ३८ महत्वाचे निर्णय

याबाबत कारागृह विभागातील आशा फड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल (Case Filed) झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक व शहर आणि जिल्ह्यांत चंदनचोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरासह (Nashik City) एमआयडीसीत (MIDC) चंदनाच्या झाडांची रेकी करुन मध्यरात्रीतून चंदन कापून नेण्याचा धंदा सुरु केला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : ‘लाडकी बहीण’ योजनेचे मनपाकडून ६ हजार अर्ज रद्द

विशेष पोलीस महानिरीक्षक, महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनी, पोलीस अधिक्षक, कारागृह अधिक्षक, शासकीय अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने तर दस्तुरखुद्द वनविभागातील अधिकाऱ्याच्या कार्यालयांसह निवासस्थानातही चंदन चोरीच्या घटना झाल्या आहेत. एका प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) चंदनचोरांच्या टोळीतील एका संशयितास पकडले होते. त्याच्याकडून इतर गुन्हे उघड झालेले नाहीत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या