Sunday, October 18, 2026
Homeक्राईमNashik Crime : सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर फोडले; चोरट्यांनी तब्बल 'इतक्या' लाखांचा ऐवज...

Nashik Crime : सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर फोडले; चोरट्यांनी तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज केला लंपास

देवळाली कॅंम्प | वार्ताहर | Devlali Camp

देवळाली कॅम्प परिसरातील लहवित गावात (Lahvit Villagae) अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर फोडून तब्बल ९७ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Devlali Camp Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : राम रथ यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीत १० भाविकांचे लाखो रुपयांचे दागिने लंपास

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, संतोष रत्नाकर कुलथे (वय ४७, रा. माळवाडी रोड, लहवित) यांचे ‘सारिका ज्वेलर्स’ नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान गावात आहे. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्री २.३० ते पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ५६ लाख रुपये), २० किलो चांदीचे दागिने (अंदाजे किंमत ४० लाख रुपये) तसेच १ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९७ लाखांचा ऐवज लंपास केला.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिकच्या चाकांना युद्धाची झळ! इंधन टंचाई, किंमत वाढीच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला ‘कात्री’

पहाटे ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास एका मोटारसायकलस्वाराला दुकानाचे शटर उघडे दिसल्याने ही बाब उघडकीस आली. त्याने तात्काळ संतोष कुलथे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दुकानाकडे धाव घेत पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी ते बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गावातील सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

ताज्या बातम्या

Accident News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात; अनियंत्रित ट्रकने १५...

0
नवी दिल्ली | New Delhi देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असताना आणि ठिकठिकाणी देवीचा जागर सुरू असतानाच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी...