Tuesday, April 28, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

व्यवसायात बरकत करून देतो म्हणून अनेक भक्तांना वेगवेगळे मार्ग दाखवून गंडवणाऱ्या कॅप्टन अशोककुमार खरात (Ashok Kharat) याच्यामुळे मालामाल झाल्याचे सांगायला आजपर्यंत कोणीही पुढे आलेले नाही. त्यातून झालाच तर खरातच मालामाल झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेचा, पाहण्याचा विक्रम करणाऱ्या खरातच्या कारनाम्यांच्या बातम्यांमुळे अनेक यूट्यूबर्स (YouTubers) पोर्टलच्या संचालकांना मालामाल होण्याची संधी मिळाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती

उद्योग व्यवसायात बरकत मिळवण्यासाठी गंडे, दोरे, अंगठी, राशीचे खडे खरातकडून घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची चर्चा आहे. त्यातील काहींनी आपल्याला कसे गंडवले गेले याची माहिती देत पोलिसांकडे तक्रारही केली आहे. मात्र, खरातच्या गंडे, दोऱ्यामुळे आपल्याला आर्थिक फायदा (Benefit) झाल्याचे सांगायला आजपर्यंत कोणीही पुढे आलेले नाही. गुगल या सर्च इंजिनवर गेल्या काही दिवसांत खरातची माहिती शोधणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच

खरात नेमका कोण, कुठला याची माहिती जाणून घेण्याची इच्छा अनेकांना झाली. त्यामुळे गुगलवर खरातचा तपास करणाऱ्या, त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याच्या युजर्सच्या संख्येने विक्रम केला आहे. फेसबुक, इस्टाग्राम, एक्सवरही खरातबद्दल जाणून घेणाऱ्या फॉलोअर्सची संख्या अधिक होती. या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्ममुळे सर्वत्र खरातचाच बोलबाला झाला. यू ट्यूबवरील अनेक पोर्टल, चॅनल्स, न्यूज चॅनल्सनेही खरातच्याच बातम्या, कारनामे मिठ मिरची लावून रंगवल्या. त्यातून अनेक पोर्टल, रिल्स चालकांना लाखो रुपये कमावण्याची संधी मिळाल्याचे समजते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : ‘क्राइम सीन’ रिक्रिएट; भोंदू खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीत SIT ला काय-काय मिळालं?

कर्जदारांमध्ये खुशीची लहर

खरातकडे पैसे गुंतवणारे ग्राहक यायचे. तसेच पैसे व्याजाने घ्यायलाही ग्राहक यायचे, अशी चर्चा आहे. अनेक पोलीस अधिकारी, महसूल विभागातले उच्च पदस्थ अधिकारी विश्वासाने खरातकडे पैसे आणून टाकायचे अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला येते. हे पैसे खरात पुढे गरजूंना व्याजाने द्यायचा. अर्थात ही रक्कम पंचवीस-पन्नास लाखांच्या पुढेच असायची, सराफ (सोन्याची पिढी चालवणारे), बांधकाम व्यवसायिक कर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यायचे. हा सौदा रोखीतच असल्याने त्याची फारशी लिखापडी नसायची. मात्र, कोणालाही असे व्याजाने पैसे देण्यासाठी खरात कुणाला तरी मध्यस्थ म्हणून घ्यायचा. लाभार्थ्याने व्याज अथवा मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ केली तरी मध्यस्थीवर वसुलीची जबाबदारी यायची, नाशिकच्या एका सराफी व्यावसायिकाला अशाच पद्धतीने मध्यस्थाच्या शिफारशीवरून खरातने ५० लाख दिल्याची चर्चा आहे. सोन्याच्या भावातील चढउतारामुळे ही सराफी पिढी बंद पडली. त्याने हात वर केल्यानंतर खरातनेही मध्यस्थाकडून ही रक्कम वसूल केल्याचे समजते. मध्यस्थाकडेही एवढे पैसे नसल्याने खरातने त्याच्या नावावर बँकेतून कर्ज काढले आणि आपले पैसे वसूल केल्याची चर्चा आहे. खरातने अशा पद्धतीने करोडो रुपये नाशकातच अनेकांना व्याजाने दिल्याचे समजते. त्याची कुठलीही लिखापडी नसल्याने खरातला अटक होताच अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्याची चर्चा आहे. तर ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्यांना पैसे बुडण्यापेक्षा पोलीस आपल्या मागे तर लागणार नाहीत ना याच चिंतेने अधिक ग्रासले असल्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर

खरातने पिस्तुल असल्याचा दम भरला होता

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे, प्रा. सुदेश घोडेराव दातरंगे, घोडेराव यांनी थेट खरातच्या नाशिक येथील कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयावर धाव घेत भविष्याच्या नावावर सर्वसामान्यांना गंडवण्याचा हा उद्योग बंद करो. तुमच्याकडे दैवी शक्ती असेल तर समोर बसा आणि आमचे भविष्य सांगा, असे आव्हानच दिले होते. हे कार्यकर्ते बोलण्यात भारी पडू लागल्यानंतर खरातने आपल्याकडे पिस्तोल असल्याचा दम त्यांना भरला होता. त्याचवेळी खरातचे गुंडही त्याच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू लागले होते. त्यामुळे या दोघांना तेथून परत यावे लागले होते. अंनिसने त्यावेळी खरातबद्दल काही तक्रारी असतील तर थेट अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहन फोन नंबर देऊन केले होते. मात्र, त्यावेळी तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे न आल्याने अंनिसला आपले हे अभियान थांबवावे लागले होते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...