Tuesday, April 28, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिकच्या चाकांना युद्धाची झळ! इंधन टंचाई, किंमत वाढीच्या नावाखाली...

Nashik News : नाशिकच्या चाकांना युद्धाची झळ! इंधन टंचाई, किंमत वाढीच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला ‘कात्री’

एलपीजी विरला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इराण-इस्रायल आणि अमेरिका (Iran and America-Isreal) यांच्यातील संघर्षाचा धूर आता नाशिकच्या (Nashik) रस्त्यांवर दिसू लागला आहे. जागतिक स्तरावरील इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम म्हणून शहरात सीएनजी आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे ‘शासन आणि जिल्हा प्रशासन सर्व काही आलबेल’ असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे नाशिकच्या सामान्य प्रवाशांना मात्र रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मनमानी भाडेवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागत आहे. काहींना पेट्रोल व सीएनजीसाठी शोधाशोध करुन तासन्तास वाट पहावी लागत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच

केंद्र व राज्य सरकारकडून (Central and State Government) इंधनाचा तुटवडा नसल्याचे वारंवार ठासून सांगितले जात आहे. मात्र, नाशिकच्या एलपीजीसह सीएनजी पंपांवरील लांबलचक रांगा वेगळचं सांगत आहेत. प्रशासकीय यंत्रणा केवळ ‘कागदी साठा’ दाखवण्यात मग्न आहे, परंतु प्रत्यक्षात पंपांवर पोहोचल्यावर वाहन धारकांना निराशेचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा पुरवठा विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याऐवजी केवळ कार्यालयात बसून अहवाल तयार करण्यावर भर देत आहे, अशी भावना नागरिकांमधून उमटत आहे. इंधनाच्या (Fuel) कमतरतेचा फटका प्रवासी रिक्षा, ओला, उबेर आणि पोर्टर यासारख्या वाहतूक सेवांना बसला आहे. अनेक रिक्षांना एलपीजी मिळत नसल्याने त्यांचे चाक थांबले आहे, तर ज्यांच्याकडे इंधन आहे त्यांनी संकटाचे रूपांतर संधीत केले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : ‘क्राइम सीन’ रिक्रिएट; भोंदू खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीत SIT ला काय-काय मिळालं?

३० ते ४० टक्के अतिरिक्त वसूली

शहरात किलोमीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे नियम आधीच गुंडाळून ठेवले असताना आता त्यात इंधन टंचाईची भर पडली आहे. कॅब आणि रिक्षा चालकांनी थेट ३० ते ४० टक्के जास्तीचे भाडे मागण्यास सुरुवात केली आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना हा आर्थिक भुर्दंड निमूटपणे सोसावा लागत आहे.

वेळ आहे ‘रिॲलिटी चेक’ची!

प्रशासनाने केवळ आकडेवारीचे खेळ न खेळता, प्रत्यक्ष पंपांवर जाऊन इंधन पुरवठ्याची स्थिती तपासावी आणि प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

आम्हाला हौस नाही प्रवाशांकडून जास्त पैसे घ्यायची. पण सकाळी सहा वाजेपासून सीएनजीच्या रांगेत उभं राहूनही गॅस मिळत नाहीये. १० वाजेपर्यंत रांगेत गेल्यावर दिवसाची कमाई कधी करणार? प्रशासनाने ‘साठा भरपूर आहे’ असं म्हणण्यापेक्षा पंपावर गॅस उपलब्ध करून द्यावा, म्हणजे जुन्या दरात प्रवाशांना नेता येईल.

त्रस्त रिक्षाचालक (द्वारका परिसर)

उपनगर येथून शालिमारला येण्यासाठी कॅब बुक केली असता ‘राईड’ कॅन्सल केली जाते किंवा चालक फोन करून ‘एक्स्ट्रा’ पैशांची मागणी करतात. अॅपवर एक भाडं दिसतं आणि प्रत्यक्षात ड्रायव्हर दुप्पट पैसे मागत आहेत. इंधन टंचाईचं निमित्त करून ही लूट सुरू आहे.

संदीप डांगळे, ओला-उबर वापरकर्ता

रिक्षाचालक ‘मीटर’ प्रमाणे यायला तयारच नाहीत, साठा असूनही काही पंप चालक गैरसमज पसरविण्यास मदत करत आहेत.

साहिल पगारे, महाविद्यालयीन विद्यार्थी (नाशिकरोड)

मध्यंतरी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते तेव्हा बरं वाटलं. आता युद्धाच्या नावाखाली नाशिकमध्ये वेगळचं वातावरण तयार केलं जातं आहे. घरगुती गॅसचा पुरवठाही विस्कळीत होण्याची भीती आहे. सरकारने केवळ आकडेवारी न सांगता प्रत्यक्ष साठेबाजी रोखली पाहिजे.

गजानन ढोमसे, ज्येष्ठ नागरिक, पंचवटी

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...