Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : मिशन घरफोडी सक्सेस! नाशिकमध्ये ४३ दिवसांत ३४ घरे व...

Nashik Crime : मिशन घरफोडी सक्सेस! नाशिकमध्ये ४३ दिवसांत ३४ घरे व मंदिरे लक्ष्य

'व्हिजिबल पोलिसिंग' दृष्टिआड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात दृश्य स्वरूपातील पोलिसिंगचा (Police) गवगवा केला जात असतानाच, उपनगरांतील घरे व मंदिरेही (Home and Temple) आता असुरक्षित असल्याचे अधोरेखित झाले आहे. कारण, नाशिकमध्ये (Nashik) १ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या ४३ दिवसांच्या कालावधीत ३४ ठिकाणी चोरट्यांनी घरे व मंदिरे फोडून तब्बल ६१ लाख, ९७ हजारांचे दागिने व रोख रकमा लांबविल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील केवळ चार ते पाचच गुन्हे उघड करण्यात पथकांना यश आले असून उर्वरित घटनांच्या तपासाचा फुगवटा वाढता वाढता वाढतच आहे.

- Advertisement -

शहरातील तेरा पोलीस ठाण्यात (Police Station) सर्व अलबेल असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ‘कलेक्शन’ सह विशेष जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या व गिळंकृत करण्याच्या प्रकारातून थेट पोलीस निरीक्षक व अंमलदारांच्या टेबला खालील बदलीकांडाचे पितळ उघडे पडले होते. वरिष्ठांची मर्जी राखण्यासह हद्दीतील अवैध धंदे व वसुलीवर पकड मिळविण्यासाठी काही अंमलदारांनी (कलेक्टर्स) एकमेकांवर चाल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

YouTube video player

दरम्यान, हे गंभीर प्रकार सुरू असताना कोणत्याही पोलीस ठाण्याने व गुन्हे शाखा (Crime Branch) पथकांनी घरफोडीच्या घटनांची उकल करण्याचे मनावर घेतल्याचे दिसत नाही. नित्यनियमाने घडणाऱ्या जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची केवळ पोलीस दप्तरी नोंद होत आहे. त्यामुळे घरफोडीची फिर्याद देऊन गुन्हे तपासासाठी महिनोंमहिने पाठपुरावा करून वैतागलेल्या नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातच विशेष करून दोन्ही परिमंडळांच्या क्षेत्रात चोरी व घरफोडीचे बहुतांश गुन्हे ‘अनडिटेक्ट’ आहेत.

गेले खबरे कुणीकडे?

खबरे हे पोलिसांचे (Police) कान आणि डोळे समजले जातात. त्यांच्या माहितीवरच पोलीस अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणतात. मात्र, अलिकडे तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खबऱ्यांचे वाढलेले दर, मिळणारा अपुरा निधी अशा विविध कारणांमुळे हेच कान आणि डोळे पोलिसांपासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात अडचणी येत असल्याचे समजते. खबऱ्यांना सांभाळण्यासाठी पोलिसांना मिळणारा ‘सिक्रेट फंड’ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे टीप देणाऱ्या खबऱ्यांचे जाळे क्षीण होत चालले आहे.

‘एकच मोड्स’, एक कोटी चाळीस लाखांचा मुद्देमाल सापडेना

शहरात गेल्या दोन ते सव्वादोन महिन्यांत घरफोडीचे एकूण ७० गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांत एक कोटी, ४० लाख रुपयांचे दागिने, रक्कम, घरगुती साहित्य, चांदी आदी वस्तूंची चोरी झाली आहे. विशेषतः, अनेक घरफोड्यांची प्रकरणे बारकाईने अभ्यासली असता, बहुतांश गुन्ह्यांत चोरट्यांनी घरफोडींसाठी ‘एकसारखीच पद्धत’ (मोडस् ऑपरेंडी) अवलंबल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या घटनांतील चोरटे व त्यांची टोळी कनेक्टेड असण्याचा दाट संशय आहे. एकाच परिसरात, सोसायटीत एकाच वेळी दोन ते तीन घरफोड्या सलग करण्यात आल्याचे आढळले आहे.

मुद्दे

  • ऑगस्टमध्ये सर्वाधिक सात घरफोड्या पंचवटी पोलिसांच्या हद्दीत
  • सध्या उपनगर, पंचवटी, नाशिकरोड घरफोडीचे ‘हॉट स्पॉट’
  • संपूर्ण जुलैत ३६ घरफोड्यांमध्ये ७८ लाखांचा ऐवज लंपास
  • शहर पोलिसांची चोरट्यांवरील पकड सैल
  • स्टॉप अॅन्ड सर्च’ मोहीम केवळ फार्स ठरत असल्याचा आरोप
  • निर्भया, बीटमार्शल, व्हिजिबल पोलिसिंगची नुसतीच चर्चा
  • नाईट राऊंडदरम्यान गुन्हेगारांचा मुक्त वावर
  • पोलिसांचे ‘खबरी’ पसार
  • टिप मिळत नसल्याने शोधाचे प्रमाण नगण्य
  • गस्त तोकडी पडत असल्याने घरफोड्या वाढल्याचा अंदाज

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...