नाशिक | प्रतिनिधी
शहरातील तिवंधा चौकातील (Tiwandha Chowk) प्रसिध्द साक्षी गणेश मंदिरातून (Sakshi Ganesh Temple) चोरट्यांनी सुमारे दोन किलो वजनाची चांदीची मूर्ती (Silver Idol) चोरून नेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत साक्षी गणेश मंदिराचे पुजारी दिलीप चंद्रिका प्रसाद दुबे (रा.वृंदावननगरी, हिरावाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, रविवारी सकाळी नियमित पुजा पाठ करून ते आपल्या घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या मंदिरात शिरून ही चोरी केली.
दरम्यान, मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी गाभार्यातील मुख्य मूर्ती जवळ ठेवलेली जुनी दोन किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरून नेली. ही बाब निदर्शनास येताच दुबे यांनी पोलीसात धाव घेतली. यानंतर पोलीस (Police) परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत आहेत. तर याप्रकरणी हवालदार काकड अधिक तपास करीत आहेत.




