नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येवला-विंचूर रोडवरील (Yeola-Vinchur Road) एका बंगल्यात सुरू असलेला बनावट विदेशी मद्यनिर्मितीचा अवैध कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री उद्ध्वस्त केला. छाप्यात सुमारे तीन लाख रुपयांचे मद्य व साहित्य जप्त करण्यात आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
येवला भरारी पथकाला विंचूर-येवला मार्गावरील जय भगवती बंगल्यात बनावट मद्यनिर्मिती (Fake Liquor) सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवट यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१६) रात्री अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित बंगल्यात विविध नामांकित ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचा २ लाख २० हजार ६७० रुपयांचा साठा आढळून आला.
हे देखील वाचा : नात्यागोत्यांच्या ‘मेळ्या’त मतदारांची डझनभरांना नापसंती; कोण ठरलं अपयशी?
त्यासोबतच बनावट मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लेबल, बूच, रिकाम्या बाटल्या तसेच एक मोबाईल असा एकूण २ लाख ८७ हजार ४२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नंदकुमार दत्तात्रय गायकवाड (६२, मूळ रा. शाकंबरी, गंधर्वनगरी, नाशिकरोड), श्रवण गाणोर पासवान (५६, मूळ रा. मधुबनी, बिहार) आणि रामबालक कुमार रामदेव पासवान (२६, मूळ रा. मधुबनी, बिहार) या तिघांना अटक (Arrested) केली आहे.
हे देखील वाचा : भाजपसह ठाकरेंची सेना आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार; महापालिकेत आणखी नगरसेवकांचा होणार प्रवेश, पण नेमका कसा?
दरम्यान, या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, मनिष पाटील, अवधूत पाटील, मुकेश निबेंकर, संतोष मुंढे, सुनिल टापरे, विठ्ठल हाके, योगेश म्हस्के, दीपक नेमणार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक करीत आहेत.
हे देखील वाचा : महापौरपद ‘या’ प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी सुटण्याची शक्यता




