Monday, April 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : शहरातून तीन वाहने लंपास; कार विक्रीत सहा लाखांची...

Nashik Crime : शहरातून तीन वाहने लंपास; कार विक्रीत सहा लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर परिसरातून (City Area) वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सागर सोमनाथ कहाणे (रा. बोरगड, म्हसरुळ) यांची दुचाकी बुधवार (दि.४) मध्यरात्री शिवपूजा अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

- Advertisement -

तर, निलेश अशोक देवळे (रा. काठेगल्ली, भद्रकाली) यांची दुचाकी टाकळी येथील चिस्तीया ट्रान्सपोर्टसमोरून शुक्रवारी (दि. ६) सकाळी चोरीला गेली. तसेच प्रदीप यशवंत हिरे (रा. खांदवेनगर, सातपूर) यांची दुचाकी बुधवारी मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधून लंपास झाली. संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

कार विक्रीत सहा लाखांची फसवणूक

नाशिक | महिंद्रा टीयूव्ही ३०० या चारचाकी वाहनांच्या व्यवहारात सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली. राम मुरलीधर अंभोरे (४२, रा. सायखेडा रोड, ओझर) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित कृष्णा भीमा गोहिरे (रा. रायगडनगर, ता. नाशिक) याने इंडिया मोटर्स कार मॉलमधून टीयूव्ही कार ६ लाख ७६ हजारांना खरेदी केली. मात्र व्यवहारातील उर्वरित ५ लाख ५१ हजार ९०० रुपये न देता वाहनांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस (Mumbai Naka Police) तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...