Saturday, February 21, 2026
HomeनाशिकNashik Crime : पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

Nashik Crime : पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

गावठी पिस्तूल (Gavathi Pistol) आणि जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा युवकांना गुंडां विरोधी पथकाने (दि.१९) रोजी जेलरोड मार्गावरील कन्या कोठारी शाळेच्या भिंतीलगत ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंडाविरोधी पथकाचे कर्मचारी राजेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन युवक हे जेल रोड मार्गावरील कोठारी कन्या शाळे लागत पिस्तूल विक्री साठी येणार आहे. त्यांनी तत्काळ याबाबत वरिष्ठांना कळवले.

YouTube video player

दरम्यान, यावेळी पथकाचे कर्मचारी विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे आदींनी सापळा रचून संशयित राहुल उर्फ गोटू प्रभाकर साठे (रा.३२ साठे नगर सिन्नर फाटा), निशांत उत्तम सोनवणे (रा. न्यू ज्योत अपार्टमेंट, सैलानी चौक जेलरोड) यांना ताब्यात घेत त्यांच्या अंग झडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळून आले.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पत्नीविषयी वाईट बोलला अन् जीव गमावला; डोक्यात दगड...

0
बेलगाव कुऱ्हे | वार्ताहर| Belgaoan Kurhe पिंपळगाव डुकरा परिसरात राहणाऱ्या संशयिताने त्याच्या पत्नीविषयी (Wife) वाईट बोललेल्या एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. अनिल...