Friday, July 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Nashik Crime : अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

अंमली पदार्थ (एमडी ड्रग्स) बाळगणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना (Criminal) उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) शिताफीने अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलांसह एक लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपयुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

यावेळी काळे यांनी सांगितले की, उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे शिपाई सुरज गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलिस हवालदार संदीप पवार,विनोद लखन,गौरव गवळी,प्रशांत देवरे,पंकज करपे,आदींनी जेलरोड येथील जुना सायखेडा रोड,दुर्गा माता मंदिराजवळ संशयित सौरभ दिगंबर महाले (वय २७) गुरुकुल सोसायटी,धात्रक फाटा,नाशिक, कौस्तुभ धनंजय इखणकर वय २४) नीलमणी सोसायटी, जुना सायखेडा रोड, जेलरोड यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली.

यावेळी त्यांच्याकडून पाच ग्राम वजनाचे अमली पदार्थ तसेच दोन मोबाईल फोन,दुचाकी,पोलिसांनी (Police) जप्त केल्या. तसेच हे अंमली पदार्थ कुठून आले याची चौकशी केली असता संशयित इर्शाद चौधरी, जयभवानी रोड याला ताब्यात घेत त्यांच्याकडून पुन्हा ५ ग्राम एमडी व दोन गावठी पिस्तूल असा सुमारे १ लाख ७४ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान, हे तिन्ही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) असल्याचे उपयुक्त काळे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...