Tuesday, April 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : कन्नमवार पुलाखाली शस्त्रांसह फिरताना दोघे ताब्यात

Nashik Crime : कन्नमवार पुलाखाली शस्त्रांसह फिरताना दोघे ताब्यात

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटीतील (Panchvati) अमरधाम ते तपोवन मार्गावरील कन्नमवार पुलाखाली गावठी पिस्तूल व धारदार शस्त्र घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक अल्पवयीन असून, शस्त्रे कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणली होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव अक्षद अविनाश जाधव (वय १९, रा. म्हाडा इमारत, जत्रा हॉटेलजवळ) असे आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी धारदार कोयता हस्तगत करण्यात आला आहे.पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांना कन्नमवार पुलाखाली दोन युवक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांच्यासह हवालदार महेश नांदुर्डीकर, काळे, पवार, लोणारे, गायकवाड, देशमुख, बाहिकर, वायंकडे, चितळकर व श्रीमती भोईर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांना पाहताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडे घातक शस्त्रे आढळून आली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Crime News : क्रिकेटच्या वादातून युवकाला मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील पिंजार गल्ली, पीरशहा खुंट परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (5 एप्रिल) रात्री...