Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : नाचताना धक्का अन् चॉपरचा हिसका; पंचवटीतील महादेव कॉलनीत तरुणाला...

Nashik Crime : नाचताना धक्का अन् चॉपरचा हिसका; पंचवटीतील महादेव कॉलनीत तरुणाला भोसकले

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

मखमलाबाद रोडवरील (Makhmalabad Road) महादेव कॉलनीत आयोजित हळदी समारंभात नाचताना ‘धक्का’ लागल्याच्या कारणावरून संशयितांनी (Suspected) तरुणाला भोसकले. यात युवक गंभीर जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी दोघांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

स्पर्श नितीन कामे (२१, रा. कुमावतनगर, पंचवटी) असे जखमीचे नाव आहे. अमोल धनराज कुमावत (३७, रा. कुमावतनगर, मखमलाबादरोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास कुमावतनगरमधील मनोहर अपार्टमेंट येथे मयूर कुमावतकडे हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी नाचत असताना, स्पर्शचा एका अनोळखी मुलाला धक्का लागला. त्यामुळे त्याने स्पर्शला शिवीगाळ करीत मारहाण (Beating) केली. उपस्थित नातलगांनी विरोध केल्यानंतर संशयित मुलगा निघून गेला.

YouTube video player

त्यानंतर संशयित चंद्रभान गणपत चोथवे (वय २३, रा. तरसे चाळ, क्रांतीनगर) व त्याचे साथीदार तेथे आले. त्यावेळी नाचत असलेल्या स्पर्शला चोथवे याने ‘तुझा मर्डरच करतो’, असे म्हणत धारदार हत्यार काढून डाव्या बरगडीच्या खाली भोसकले. तर त्याच्या साथीदारांनी स्पर्शला मारहाण केली. गंभीर जखमी स्पर्श कोसळल्यानंतर संशयित जमावाला धमकावून पसार झाले. स्पर्शला खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...