नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik Dam Storage) उघडझाप पाऊस सुरु आहे. मात्र, असे असले तरी महिनाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील दहा धरणे (Dam) ओव्हरफ्लो झाली आहेत. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) ९५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा पाणीटंचाईचा सामना कमी प्रमाणात करावा लागण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik News : ढोलपथकावर नियंत्रण; विसर्जन मिरवणुकीत नियम पाळण्याचे आदेश
जिल्ह्यातील भावली, वालदेवी, माणिकपुंज, केळझर, हरणबारी, भोजापूर,तिसगाव, ओझरखेड, वाघाड, आळंदी ही धरणे शंभर टक्के भरली असून, ओसंडून वाहत आहेत. तसेच या धरणांत पाण्याचा साठा वाढल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदाकाठावर मोठ्या प्रमाणावर पाणी पाहायला मिळत असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik Ganeshotsav 2024 : वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा; शिंपी परिवाराने साकारला आकर्षक देखावा
दुसरीकडे कश्यपी धरणात (Kashyapi Dam) गेल्या वर्षापेक्षा यंदा ३१ टक्के साठा अधिक आहे. तर गौतमी गोदावरीत ९५ टक्के साठा असून, हा साठा गतवर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय पालखेड धरणात ७१.९८ टक्के साठा आहे. तसेच करंजवण धरण बर्यापैकी भरले असून, गेल्यावेळी केवळ ६५.४४ टक्के साठा होता. त्यासोबतच मुकणे धरण ८६ आणि कडवा धरण ८८ टक्के भरले आहे. तर दारणा धरणात गेल्यावर्षी इतकाच म्हणजे ९५.८६ टक्के साठा आहे.
हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
दरम्यान, पावसाने (Rain) काहीशी विश्रांती घेतली असली तरी उद्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. तसेच उद्या जिल्ह्याला यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील नांदगाव, येवला, सिन्नर, मालेगाव यासारख्या तहानलेल्या तालुक्यांना दिलासा मिळाला आहे.
हे देखील वाचा : तुडुंब भरलेल्या जायकवाडीचे ६ दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
जायकवाडीचे ६ दरवाजे उघडले
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) तब्बल ९७.३० टक्के भरले आहे. त्यामुळे आज सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले. ०.५ फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सध्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात ३ हजार १४४ क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा