Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक बुधवारी दिग्गज नेत्यांच्या सभांनी ढवळून निघणार

नाशिक बुधवारी दिग्गज नेत्यांच्या सभांनी ढवळून निघणार

नाशिक | प्रतिनिधी

पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहील्याने बुधवारी दिग्गज नेत्यांच्या सभांनी नाशिक जिल्हा ढवळुन निघणार आहे. आरोप प्रत्यांरोपांच्या फैरी झडणार आहेत. महायुतीच्या तसेच महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये येणार असून नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वताः पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा बुधवारी (१५) मे रोजी पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात दुपारी एक वाजता होणार आहे.

- Advertisement -

तसेच,मविआच्या उमेदवारांसाठी (१५) मे रोजीच नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार ही १५ तारखेलाच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहे. एकाच दिवशी तीन दिग्गज नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडणार असल्याने चांगलेच वैचारीक खाद्या मतदारांना मिळणार आहे.

हे ही वाचा : पुण्यात शिंदे गटातील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; ऐन निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

मोदींची सभा यशस्वी व्हावी यासाठी भाजपकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या सभांचे नियोजनदेखील भाजपकडून केले जात आहे. मंगळवारी दुपारी महसुल मंत्री राधाकृष्ण विख पाटील नाशिकमध्ये तळ ठोकुन बसले होते. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या आक्रमक प्रचाराला आक्रमकतेनेच उत्तर दिले जाणार आहे.

हे ही वाचा : VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ‘भावी’ खासदारांमध्ये जुंपली

पंतप्रधान मोदी नाशिक जिल्ह्यात असतानाच शरद पवार यांच्याही दोन सभा दिंडोरी मतदारसंघात वणी आणि निफाड येथे होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही नाशिकमध्ये जाहीर सभा बुधवारीच होणार आहे. त्यामुळे तीनही दिग्गज नेते एकाच दिवशी जिल्ह्यात प्रचार करणार असल्याने या सभांकडे अवघ्या राज्याच्या नजरा लागल्या आहेत. पोलिस दलाची उद्या परीक्षा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या