दिंडोरी | प्रतिनिधी | DIndori
नाशिकरोड (Nashik Road) येथील वडनेर दुमाला गावात (Vadner Dumala) बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना ताजी असतानाच आता दिंडोरी शहरातील (Dindori City) बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जनाबाई बदादे (६५)असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या (Woman) नाव आहे. शेतात काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आजुबाजूच्या कामगारांनी तिला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. मात्र तिच्या मानेला बिबट्याने लचका घेतल्याने ती जागीच ठार झाली.
हे देखील वाचा : Nashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
दरम्यान, दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, मयत महिलेचे नातेवाईक वनविभागाच्या (Forest Department) कार्यालयासमोर मृतदेह नेण्याच्या तयारीत आहे. त्यामळे पोलीस आणि नातेवाईक यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.




