Saturday, October 17, 2026
Homeक्राईमNashik News: चक्का नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हॉट्स ॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या...

Nashik News: चक्का नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हॉट्स ॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरुन…

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद (Nashik District Collector Ayush Prasad) यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने बनावट ‘व्हॉट्स ॲप बिझनेस अकाउंट’ (Fake Whats App Account) तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. या खात्यावरून नागरिकांना संदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

बनावट खात्यावर नाव व जिल्हाधिकारी, नाशिक यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. तसेच थायलंडच्या ६६ ९२ ४५५ ६०७४ या क्रमांकावरून बिझनेस अकाउंट तयार करण्यात आले आहे. या क्रमांकावरून नागरिकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांनी या क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना अथवा दूरध्वनीला प्रतिसाद देऊ नये. तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे खाते अधिकृत नसून, संशयास्पद संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये. अशा प्रकारचा संपर्क आढळल्यास संबंधित यंत्रणेला तत्काळ माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...