Friday, October 16, 2026
Homeमुख्य बातम्याखासगी रुग्णालयांना उपचाराचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक

खासगी रुग्णालयांना उपचाराचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक

नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

राज्यातील खासगी रुग्णालयांना उपचार, तपासण्या आणि विविध वैद्यकीय सुविधांचे दर मराठी आणि इंग्रजी भाषेत ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले. दरपत्रक लपवणे किंवा शुल्काबाबत संदिग्धता ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा आणि नियमावली २०२१ मधील अनुसूची ३ नुसार वैद्यकीय सेवा आणि रुग्णालयातील सुविधांचे दर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या संभाव्य खर्चाचा अंदाज येणार असून, वैद्यकीय खर्चाचे नियोजन करणे आणि बिलाबद्दल अनावश्यक वाद टाळणे शक्य होणार आहे.

मुंबई शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांनी लागू असलेल्या नियमांनुसार सेवा तसेच सुविधांचे दरपत्रक रुग्णालयाच्या आवारात सहज दिसेल आणि वाचता येईल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. हे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत असावे. दरांमध्ये बदल केल्यास सुधारित दरपत्रक तातडीने प्रदर्शित करावे लागणार आहे.

रुग्णालयांनी सेवा शुल्क, विविध उपचार पॅकेजेस आणि त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबत रुग्णांना पुरेशी माहिती द्यावी. नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना दरपत्रक तसेच शुल्काबाबत योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे बिलांबाबत निर्माण होणारा संभ्रम आणि तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

परदेशी रुग्णांसाठीही पॅकेज दर
वैद्यकीय व्हिसा किंवा आयुष व्हिसावर भारतात उपचारासाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी त्यांच्यासाठी लागू असलेले विशेष उपचार पॅकेजचे दरही स्पष्टपणे प्रदर्शित करावेत, असे परिपत्रकात निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

MPSC : एमपीएससी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे देण्याचा निर्णय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आहे....