नवी दिल्ली,
- Advertisement -
१६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग झाल्याची तक्रार असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
मिळालेल्या वृत्तानुसार, ९८ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना रुग्णालयाच्या फुफ्फुसविकार विभागात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत



