Sunday, September 6, 2026
HomeनाशिकNashik Fire News : ऑइल गोदामाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

Nashik Fire News : ऑइल गोदामाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील दादासाहेब गायकवाड हॉल (Dadasaheb Gaikwad Hall) परिसरातील एका ऑइल गोदामाला सोमवारी सायंकाळी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) तब्बल आठ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. तर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. तसेच पोलिसांचा देखील परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

दरम्यान, आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ऑइल साठ्यामुळे आग झपाट्याने पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते.

ताज्या बातम्या

जरांगे यांनी टोकाचे पाऊल उचलू नये – ना. विखे पाटील

0
लोणी |वार्ताहर| Loni मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर...