Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : भोसला मिलिटरी स्कूलच्या नावावर बेरोजगारांसह नातेवाईकांना लाखोंचा गंडा

Nashik Fraud Crime : भोसला मिलिटरी स्कूलच्या नावावर बेरोजगारांसह नातेवाईकांना लाखोंचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूररोडवरील (Gangapur Road) भोसला मिलिटरी स्कूलमध्ये (Bhonsla Military School) नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका एजंटने सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले. गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे या स्कूलच्या नावाचा वापर करून होणाऱ्या फसवणुकीचे सत्र थांबत नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

ध्रुवनगर भागातील रहिवासी अमोल श्रीधर यादव आणि त्यांच्या नातेवाईकांना हा गंडा घालण्यात आला. संशयित (Suspected) भाऊराव शंकर खुटे याने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ओळख असल्याचे भासवले. सुरुवातीला त्याने फिर्यादीच्या वहिनीला स्कूल बसवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर संस्थेत वेगवेगळ्या पदांच्या ५३ जागा निघाल्या असून, सर्व जागा भरल्याशिवाय नियुक्ती आदेश (ऑर्डर) निघणार नाहीत, असा बनाव रचला.

दरम्यान, या ५३ जागांच्या जाळ्यात अडकून फिर्यादीने स्वतः प्रयोगशाळा सहायक (लॅब असिस्टंट) पदासाठी सात लाख रुपये देण्याचे कबूल केले. जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत संशयित खुटे याने फोन-पेद्वारे आणि रोख स्वरुपात तब्बल ३३ लाख १६ हजार ५०० रुपये उकळले. मात्र, अनेक महिन्यांनंतरही नोकरी न मिळाल्याने आणि पैसेही परत न आल्याने अखेर फसवणूक (Fraud) झाल्याचे उघड झाले.

पुन्हा वादात

भोसला मिलिटरी स्कूलच्या नावाचा वापर करून आर्थिक फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही संस्थेतील विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे, प्रवेशप्रक्रिया आणि इतर शैक्षणिक बाबींमध्ये लाखो रुपयांचा अपहार व फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंद आहे.

असे झाले व्यवहार

  • अमोल यादव (स्वतः व वहिनीसाठी) : १५ लाख रुपये
  • दीपेश सोळंकी (लॅब असिस्टंट) : ५ लाख रुपये
  • शिवाजी भोसले : २ लाख ७० हजार रुपये
  • शुभम कदम: २ लाख ५९ हजार रुपये
  • संतोष जगताप १ लाख ८२ हजार रुपये
  • अनिरुद्ध फरताडे : ३ लाख ८५ हजार २२० रुपये
  • गणेश कदम (शिपाई) : ७१,५०० रुपये
  • सिद्धार्थ शिंदे (शिपाई): ४९ हजार रुपये
  • अक्षय कदम: १ लाख रुपये

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...