Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमNashik Fraud News : पार्ट टाईम नोकरीच्या अमिषाने इंजिनिअरला 'इतक्या' लाखांचा...

Nashik Fraud News : पार्ट टाईम नोकरीच्या अमिषाने इंजिनिअरला ‘इतक्या’ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सायबर चाेरट्यांनी (Cyber Theives) सातपूर परिसरातील (Satpur Area) एका इंजिनिअर तरुणास (Engineer Youth) पार्ट टाईम नोकरीची ऑफर (Part Time Job) देत फ्रि टास्क व पेड टास्क पूर्ण करण्यास भाग पाडून तब्ब्ल ११ लाख ८५ हजार रुपये उकळले आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला असून संशयितांचा शाेध सुरु झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना

सातपूर काॅलनीतील आनंद छाया स्टाॅपजवळ २७ वर्षीय आदित्य भावसार हा राहताे. ताे इंजिनिअर असून, ६ ते ११ सप्टेंबर २०२४ राेजी त्याला संशयित सायबर चाेरट्यांनी 573507111547 व अन्य क्रमांकांवरुन संपर्क साधत पार्ट टाईम जाॅबचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या अधिकच्या आर्थिक परताव्याची माहिती दिली. त्यामुळे कमी कालावधीत जास्त नफा मिळत असल्याचा विचार करुन तरुणाने या स्कीमध्ये भाग घेण्यास हाेकार दिला. यानंतर, सायबर चाेरट्यांनी या इंजिनिअरला ए-१ ॲमेझाॅन पार्टटाईम जाॅबच्या व्हाट्स ॲप व टेलिग्राम या साेशल मिडीयावर (Social Media) ज्वाॅईन करुन पार्ट टाईमच्या विविध जाहीराती पाठविल्या.

हे देखील वाचा :  Nashik News : कादवा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ उत्साहात

यानंतर, इंजिनिअरने संशयितांनी (Suspected) सांगितल्यानुसार प्राेसेस फाॅलाे केली असता, त्याला एका स्टेपचे फ्रि टास्क दिले. हे टास्क पूर्ण करताच, त्याच्या अकाउंटला पाचशे ते हजार रुपयांचा परतावा क्रेडिट केला. याच अमिषाला भुलून त्याने अधिकचे टास्क पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. हिच संधी साधून चाेरट्यांनी त्याला काही ‘पेड टास्क’ ची स्किम समजावली. त्याने हाेकार दर्शवित १० हजार रुपयांपासून ५ ते ८ लाखांपर्यंत रक्कम गुंतविली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : आयबीचे पथक नाशकात; अबू सालेमच्या मैत्रिणीसह ॲस्ट्रोलॉजर एटीएसच्या ताब्यात

मात्र, गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी त्याने ‘रिक्वेस्ट’ केली असता, चाेरट्यांनी त्याला पैसे परत मिळण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील, तेव्हाच पैसे ‘विथड्राॅल’ करता येईल, असे सांगितले. त्यामुळे इंजिनिअरने ते पैसे परत मिळविण्यासाठी पुन्हा नवीन रक्कम भरली. मात्र, त्याला काेणतेही पैसे परत मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने काही दिवसांनंतर सायबर पाेलीस ठाणे (Cyber Police Station) गाठून फिर्याद दिली. गुन्हा दाखल असून तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या