Sunday, November 3, 2024
HomeनाशिकNashik News : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना

Nashik News : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना

नाशिक | Nashik

दसऱ्याच्या निमित्ताने आज मुंबईत (Mumbai) शिवसेनेचे (Shivsena) दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा तर आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधून देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विचारांचे सोनं लुटण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pankaja Munde : “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, आता आपला डाव खेळणार”; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निर्धार

नाशिकमधून (Nashik) ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मुंबईकडे कूच केली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, मामा राजवाडे बाळासाहेब पाठक यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. खरे शिवसैनिक (Shivsainik) हे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठीच येतील अशी भावना या शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : Manoj Jarange Patil : “मला चारही बाजूने घेरलं, माझ्या समाजाला…”; जरांगेंचा नारायण गडावरून सरकारवर निशाणा

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण आजच्या दसऱ्या मेळाव्यातूनच उद्धव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. तसेच या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे हे कुणावर टीका करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या