Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Ganesh Visarjan 2025 : नाशिकमध्ये तब्बल १६ तास विसर्जन मिरवणूक; पहाटे...

Nashik Ganesh Visarjan 2025 : नाशिकमध्ये तब्बल १६ तास विसर्जन मिरवणूक; पहाटे तीन वाजता शेवटच्या मंडळाच्या बाप्पाला निरोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणपती बाप्पा मोऱया, पुढच्या वर्षी लवकर या! असे साकडे घालत गणेश भक्तांनी (Ganesh Bhakt) मुसळधार पावसात गुलालाची व फुलांची उधळण करत भव्य मिरवणुक काढुन श्री गणरायाला निरोप दिला. यावेळी अमाप उत्साह, नाशिक ढोलचा (Nashik Dhol) गजर आणि डीजेचा दणदणाटासह नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल १६ तास चालली. पहाटे तीन वाजता शेवटच्या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले.

- Advertisement -

शहरात (City) सर्वत्र लाडक्या गणरायाच्या श्री मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी (Devotees) शनिवारी सकाळी दहा पासून गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर बाप्पाला १६ तास चाललेल्या अखंड मिरवणुकीने (Procession) निरोप दिला. यावेळी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आरतीकरुन झाला. नाशिक महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्रीफळ वाढवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

YouTube video player

दरम्यान, यावेळी आ. प्रा. देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) मनपा आयुक्त मनिषा खात्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सुनील बागुल, सुरेश पाटील, गणेश गिते, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, गजानन शेलार, सुनील केदार, प्रथमेश गिते, समीर शेटे राजेंद्र बागुल, शरद देवरे, गणेश बर्वे, सुरेश दलोड, सुरेश मारु, यांच्यासह आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

२४ मंडळांच्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका

शहरातील सार्वजनिक मंडळांनी सकाळी ११ वाजेपासून सजवलेल्या रथावर श्रीमूर्ती आणत मिरवणुकीस प्रारंभ केला होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या संवाद्य मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झालेले होते. मुख्य मिरवणुकीस वाकडी बारव येथून प्रारंभ झाला. रविवार कांरंजा, अशोक स्तंभ, मानााचा राजा, प्रेरणा, दंडे हनुमान, वेलकम सहकार्य, युनायटेड फ्रेन्डस, शैनेश्‍वर मित्रमंडळ,पगडी गणेश, आदीसह २४ मंडळाच्या (24 Circles) मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात निघाल्या. यावेळी मुख्य मिरवणूक मार्गावर येताच हजारो गणेश भक्तांनी एकच जल्लोष केला.

पोलिसांचा तगडा फौजफाटा

विसर्जन (Visarjan) मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) व त्यांचे शेकडो पोलिस (Police) कर्मचारी व अधिकारी जातीने बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. शहरातील संवेदनशील भागात सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नाही. त्यामुळे बाप्पाचा उत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला.

मिरवणुकीत पावसाची बरसात

नाशिकमध्ये गेल्या दहा दिवस गणेशोत्सवात उत्साहाचे वातावरण होते. जशी मिरवणूक पुढे सरकत होती, तसा नाशिककरांचा उत्साह वाढत होता. तर मिरवणुकीवर पावसाची (Rain) देखील बरसात सुरुच होती. याशिवाय अधूनमधून पाऊस विश्रांती घेत होता. संध्याकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास पहिला मानाचा महापालिकेच्या गणपतीचे गंगाघाटावर विसर्जन करण्यात आले, त्यानंतर नाशिककरांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. तर काही मंडळांनी डीजेचा दणदणाट सुरु ठेवल्याने तरुणांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...