Wednesday, June 17, 2026
Homeमुख्य बातम्या'पॉप अप सायकल ट्रॅक'साठी 'नाशिक' पहिल्या 'आठ'मध्ये; कसा असेल हा ट्रॅक?

‘पॉप अप सायकल ट्रॅक’साठी ‘नाशिक’ पहिल्या ‘आठ’मध्ये; कसा असेल हा ट्रॅक?

नाशिक | प्रतिनिधी

इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजच्या पॉप अप सायकल ट्रॅक आराखडा चाचपणीसाठी देशभरातील आठ शहरांनी आराखडा सादर केला आहे. त्या आठ शहरांमध्ये नाशिक शहरानेही त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी (दोन्ही बाजुने) व लगतचा परिसराचा हा आराखडा सादर केला आहे….

- Advertisement -

नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर केंद्र सरकारच्या इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी झाले आहे. सदर स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यात 11 शहरांची निवड करण्यात येणार असून, त्या शहरांना सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा उभ्या करणेकामी 1 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यादृष्टीने नाशिक स्मार्ट सिटी पहिल्या अकरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सदर स्पर्धा सुरू झाल्यापासून विविध स्तरावर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यामध्ये त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी पॉप अप सायकल ट्रॅक प्रस्तावित करण्यात आला आहे, सदर पॉप अप सायकल ट्रॅकवर हँडल बार सर्वेक्षण घेण्यात आले.

महात्मा गांधी जयंती निमित्त सायक्लॉथॉन घेण्यात आला. सायकल असोसिएशन्स व स्वयंसेवी संस्था तसेच निमा, आयमा, क्रेडाईसह विविध संस्थांसोबत वेबिनार व बैठका घेण्यात आल्या.

सदर स्पर्धेमध्ये सहभागी शहरांना ‘पॉप अप सायकल ट्रॅक’ उभारायचा आहे. त्यादृष्टीने नाशिक स्मार्ट सिटीने ‘त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी’ या मार्गावर ‘पॉप अप सायकल ट्रॅक’ उभारण्यासंदर्भात आराखडा सादर केला आहे.

त्याचबरोबर नाशिक स्मार्ट सिटी, नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशन, सायकलिंग फेडरेशन, ई-3 सायकलिंग असोसिएशन, निमा, आयमा, चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई, इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिक फर्स्ट, महाविद्यालये व त्यांचे प्रतिनिधी या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.

कामगार वर्गाचा विचार करता, ‘पॉप अप सायकल ट्रॅक’ पुढे एमआयडीसीमध्ये नेण्यात यावा असे मत ०३ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या वेबिनारमध्ये मान्यवरांनी मांडले होते. त्याचबरोबर सायकलिंगच्या दृष्टीने सिडकोला अंबड व सातपूर एमआयडीसीसोबत जोडणे गरजेचे असून कंपन्यांपर्यंत सायकल ट्रॅक नेल्यास त्याचा कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल हे स्मार्ट सिटीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात ज्या शहरांची निवड होईल त्या शहरांना इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये सायकलींग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी 1 कोटी रुपये मिळणार आहेत.

खासगी वाहतुकीला सायकलींग हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर ऑफीस, शाळा आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी तसेच लहान मुले, वृद्ध यांच्यासाठीही सायकलींग सुरक्षित पर्याय असून, गरिब, श्रीमंत कुणीही सहज सायकल खरेदी करू शकते.

लॉकडाऊनच्या काळामध्ये अचानक झालेली सायकलींगची वाढ अशीच कायम रहावी व त्यात वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सायकलचा पर्यावरणपूरक, आरोग्य संवर्धक असाही उपयोग होतो. सायकलच्या वापराने मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होण्यास मदत होणार आहे.

निवड झालेल्या शहरांना खालील गोष्टी कराव्या लागणार

1. कमीत कमी खर्चामध्ये पॉप अप म्हणजे तात्पुरते सायकल ट्रॅक उभारणे. त्याद्वारे सायकल ट्रॅकचे जाळे उभे करण्यात मदत होणार आहे.

2. वाहनरहीत मार्ग बनवणे म्हणजे एखाद्या मार्गावर वाहनांना नो एन्ट्री ठेवावी लागेल. फक्त सायकल वापरास परवानगी द्यावी लागेल.

3. पायलट सायकल ट्रॅक निर्माण करणे. उदा. स्मार्ट रोडवर बनविण्यात आलेला सायकल ट्रॅक.

4. समुदायाच्या नेतृत्वात सायकल जनजागृती व सायकल भाडे योजना राबवणे. यासाठी एनजीओची मदत घेणे.

5. विविध इव्हेंट्स व विविध माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना सायकलींगसाठी उद्युक्त करणे. अशा प्रकारे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात असलेला हा बदल कायम स्वरुपी बदलामध्ये रुपांतरीत करणे.

6. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्पोर्टेशन ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) हे सदर इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज या उपक्रमासाठी मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत करणार आहेत.

7. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शनही मिळणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...