दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) चंडीकापुर बिबट्याने (Leopard) दुचाकीस्वारावर हल्ला करत जखमी केले आहे. तातडीने त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात (Vani Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पार्किंगचा वाद विकोपाला; धारदार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून
चंडीकापुर परिसरात बिबट्यांचा वावर मागील काही महिन्यांपासून वाढला असून नागरिकांमध्ये (Citizen) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना सुरेश बागुल यांच्यावर बिबट्याने झडप घालत हल्ला केला. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने बागुल हे दुचाकीवरून खाली पडले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : राम रथ यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीत १० भाविकांचे लाखो रुपयांचे दागिने लंपास
प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिबट्या अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या घटनेत बागुल यांच्या हाताला व खांद्याला दुखापत झाली असून त्यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली व वरिष्ठ अधिकार्यांना कळविले. तसेच उपसरपंच विलास कड व ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात यांनीही बागुल यांची भेट घेऊन विचारपूस केली.
हे देखील वाचा : Nashik Crime : सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर फोडले; चोरट्यांनी तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज केला लंपास
दरम्यान, चंडीकापुर परिसरात यापूर्वीही बिबट्याचे हल्ले झाले असून दोन जणांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे. परिसरात दिवसा अनियमित वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यास जावे लागत आहे. त्यामुळे अशा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा मागणी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून परिसरात पिंजरे लावण्यात येतील, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर





