Wednesday, April 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : जय भवानीरोडवर बिबट्याचे दर्शन

Nashik Leopard News : जय भवानीरोडवर बिबट्याचे दर्शन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील जयभवानी रोडवरील (Jay Bhavani Road) लोणकर मळा परिसरात बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) बिबट्या फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसून आला आहे.

- Advertisement -

स्थानिक रहिवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकारी अहिरराव यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

गेल्या ५ ते ६ दिवसांमध्ये बिबट्याचे चौथ्यांदा दर्शन आहे.सातत्याने होणाऱ्या या घटना परिसरातील नागरिकांच्या (Citizen) सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक ठरत आहेत. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, वनविभागाकडून (Forest Department) अद्याप प्रत्यक्ष पिंजरा लावण्यात आलेला नसून स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. नागरिकांनी देखील रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा आवाहन वनविभागाने केले आहे.

ताज्या बातम्या