Saturday, January 17, 2026
HomeनाशिकNashik MC Election : तब्बल 'एवढे' नवीन चेहरे पहिल्यांदाच करणार महापालिकेत प्रवेश;...

Nashik MC Election : तब्बल ‘एवढे’ नवीन चेहरे पहिल्यांदाच करणार महापालिकेत प्रवेश; वाचा प्रभागनिहाय यादी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीत (Municipal Election) १२२ जागांपैकी ७२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपचा महापौर पाहायला मिळणार आहे. भाजप पाठोपाठ शिंदेंच्या सेनेला २६, ठाकरेंच्या शिवसेनेला १५, काँग्रेसला ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०४, मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. यंदाची लढत अत्यंत लक्षवेधी ठरली असून, तपोवनाच्या मुद्द्यासह, भाजपमधील तिकीट वाटपाचा गोंधळ, ऐनवेळी नेत्यांचा झालेला पक्षप्रवेश, निष्ठावान उमेदवारांना नाकारलेली उमेदवारी आणि त्यांनी केलेली बंडखोरी यामुळे नाशिक चांगलेच चर्चेत आले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर पक्षांनी अनेक नवीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील काहींना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही जणांनी विजयश्री खेचून आणला. त्यामुळे आता जे उमेदवार निवडून आले ते महापालिकेत आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडणार आहेत. यामध्ये जवळपास ६५ नवीन उमेदवार (Candidate) निवडून आले असून, ते प्रथमच ‘राजीव गांधी भवन’ची पायरी चढणार आहेत. तर अत्यंत चुरशीच्या लढाईत सुमारे ४५ जणांनी पुन्हा निवडून येण्याची किमया केली आहे.त्यामुळे काही नगरसेवक ‘ब्रेक के बाद’ पालिकेत प्रवेश करणार आहेत.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

निवडून आलेल्या नवीन उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक ०१ – रूपाली नन्नावरे, दीपाली गीते,प्रवीण जाधव, प्रभाग क्रमांक ०२ – रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, ऐश्वर्या लाड, इंदूमती खेताडे, प्रभाग क्रमांक ०३ – जुई शिंदे,गौरव गौवर्धने, प्रभाग क्रमांक ०४ – मोनिका हिरे,सागर लामखेडे, प्रभाग क्रमांक ०५ – नीलम पाटील, चंद्रकला धुमाळ, प्रभाग क्रमांक ०६ – प्रमोद पालवे, बाळू काकड, रोहिणी पिंगळे, चित्रा तांदळे, प्रभाग क्रमांक ९ – अमोल पाटील, संगीता घोटेकर, भारती धिवरे, प्रभाग क्रमांक ८ – अंकिता शिंदे, कविता लोखंडे, प्रभाग क्रमांक १० – विश्वास नागरे, समाधान देवरे, प्रभाग क्रमांक ११ – मानसी शेवरे,सविता काळे, सोनाली भंदुरे आणि नितीन निगळ, प्रभाग क्रमांक १२ – सीमा ठाकरे, प्रभाग क्रमांक १३ – राहुल शेलार, अदिती पांडे, मयुरी पवार, प्रभाग क्रमांक १४ – समिया खान, नाझीया अत्तार, जागृती गांगुर्डे, प्रभाग क्रमांक १५ – सीमा पवार, प्रभाग क्रमांक १७ – प्रमिला मैंद, प्रभाग क्रमांक १८ – सुनिता भोजने, प्रभाग क्रमांक १९ – योगेश भोर, रुचिरा साळवे, प्रभाग क्रमांक २० – सतीश निकम, कैलास मुदलियार, प्रभाग क्रमांक २१ – जयंत जाचक, श्वेता भंडारी, प्रभाग क्रमांक २२ – वैशाली दाणी, संजीवनी हांडोरे, योगेश गाडेकर, प्रभाग क्रमांक २३ – संध्या कुलकर्णी, मंगला नन्नावरे, प्रभाग क्रमांक २४ – पल्लवी गणोरे, डॉ. पूनम महाले, प्रभाग क्रमांक २६ – निवृत्ती इंगोले, नयना जाधव, प्रभाग क्रमांक २७ – प्रियांका दोंदे, नितीन दातीर,किरण राजवाडे, प्रभाग क्रमांक २८ – शरद फडोळ, प्रभाग क्रमांक २९ – डॉ. योगिता हिरे, भूषण राणे, प्रभाग क्रमांक ३१ – माधुरी डेमसे , वैशाली दळवी, बाळकृष्ण शिरसाठ.

हे देखील वाचा : Nashik MC Election : ठाकरेंच्या सेनेला सोडून शिंदे सेनेत गेलेला ‘हा’ बडा नेता अवघ्या २८४ मतांनी विजयी; तर काहींची नगरसेवक होण्याची संधी थोडक्यात हुकली

या माजी नगरसेवकांचा पत्ता कट

दिनकर आढाव, मीराबाई हांडगे, संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, सुनीता कोठुळे, शिवाजी गांगुर्डे, कल्पना चुंभळे, अरूण पवार, शिंदेसेनेचे पंडित आवारे, जयश्री खर्जुल, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, नयना गांगुर्डे, विष्णू बेंडकुळे, पल्लवी पाटील, सीमा निगळ, पूनम मोगरे, यांचा समावेश आहे. तर मनसेचे सलिम शेख, सुदाम कोंबडे यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. कॉंग्रेसच्या वत्सला खैरे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या समीना मेमन, भाजपच्या अर्चना थाेरात, राष्ट्रवादी (अजित पवार)चे सतीश सोनवणे हे सुद्धा पराभूत झाले आहेत. अपक्ष रूची कुंभारकर, पूनम सोनवणे, शिंदेसेना पुरस्कृत अपक्ष अशोक मुर्तडक, इंदूमती खोसकर, मनीष बागुल यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

महिला आरक्षण ५० टक्के, प्रतिनिधित्व मात्र ५५ टक्के

महिलांसाठी ५० टक्के म्हणजे जागा राखीव असतानाही यंदा पालिकेत तब्बल ६७ महिलांचा प्रवेश झाल्याने खऱ्या अर्थाने महिलाराज येऊ घातले आहे. १२२ पैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्याव्यतिरिक्त आणखी सहा महिला निवडून आल्या आहेत. खुल्या जागांवर उभ्या राहिलेल्या या महिलांना पुरुषांपेक्षाही मतदारांनी अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट आहे. महिलांचे राजकारणातील स्थान जनतेने अधिक प्रमाणात स्वीकारल्याचे यातून मानता येईल. प्रभाग १, प्रभाग ८, प्रभाग ११, प्रभाग १४, प्रभाग १६ आणि प्रभाग २३ मधील खुल्या जागांवर महिलांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे.

ताज्या बातम्या

उध्दव

Uddhav Thackeray: “बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, पण…”, उध्दव ठाकरेंच्या...

0
मुंबई | Mumbaiराज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला ८९ आणि शिवसेनेला २९ जागा मिळाल्या...