नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे टपाली मतदानात आघाडीवर आहेत.तर प्रभाग क्रमांक ९ मधून टपाली मतदानात दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील हे आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २५ मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपचे उमेदवार अदिती पांडे, बबलू शेलारआणि हितेश वाघ आघाडीवर आहेत.
तर शाहू खैरे पिछाडीवर असून, शिंदे सनेचे गणेश मोरे आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ११ मधून आरपीआयच्या दिशा लोंढे आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक १६ तून शिंदे शिवसेनेचे राहुल दिवे आघाडीवर आहेत. याशिवाय भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधव आघाडीवर आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ३ मधून अंबादास खैरे आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग २० मधून पोस्टल मतदानात शिवसेना उबाठाचे हेमंत गायकवाड, अश्विनी पवार, गायत्री गाडेकर आणि योगिता गायकवाड या आघाडीवर आहेत.




