Saturday, August 1, 2026
HomeनाशिकNashik MC Election Result : नाशकातील पहिला कल हाती; भाजपचे सुधाकर बडगुजर...

Nashik MC Election Result : नाशकातील पहिला कल हाती; भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, पाहिला कल हाती आला आहे.

- Advertisement -

प्रभाग क्रमांक २५ मधून सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत. तर २९ मधून टपाली मतदानात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर आहेत. नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार होते. यातील निम्म्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...