नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik News) आगामी महापौर पदाबाबत (Mayor Post) राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, २०२६ च्या पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती (एससी) महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महानगरपालिकेवर प्रचंड बहुमतासह भाजपला सत्ता मिळाली आहे. १२२ पैकी ७२ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविल्याने महापौर भाजपचाच होणार हे निश्चित असले, तरी कोणत्या प्रवर्गाला आरक्षण पडते आणि कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठवडाभरात महापौर आरक्षणाची (Mayor Reservation) सोडत होऊन चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महापौरपदाचे आरक्षण मुंबई येथे राज्यस्तरीय सोडतीद्वारे निश्चित होणार आहे.तरी नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत पहिले अडीच वर्षे महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गासाठी राखीव राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून इच्छुक नगरसेवक वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत आहेत.
हे देखील वाचा : नात्यागोत्यांच्या ‘मेळ्या’त मतदारांची डझनभरांना नापसंती; कोण ठरलं अपयशी?
आगामी सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौरपदाला विशेष महत्व आले असल्याने लॉबिंग अधिक तीव्र बनली आहे.
२०१७ मध्ये पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी भाजपकडे ६६ नगरसेवक होते आणि ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना महापौरपद मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आणि सतीश कुलकर्णी महापौर झाले होते. यंदाही त्याच पद्धतीने दोन टप्प्यांत महापौर निवड होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं; म्हणाले, “आता त्यांनी विरोधी…”
दरम्यान, नाशिक महापालिकेत आरक्षण (Nashik MC Reservation) पद्धत १९९७ नंतर लागू झाली. त्यानंतर वसंत गिते, अशोक दिवे, डॉ. शोभा बच्छाव, दशरथ पाटील, बाळासाहेब सानप, विनायक पांडे, नयना घोलप, अॅड. यतीन वाघ, अशोक मुर्तडक, रंजना भानसी आणि सतीश कुलकर्णी यांनी महापौरपद भूषविले आहे.
हे देखील वाचा : भाजपसह ठाकरेंची सेना आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार; महापालिकेत आणखी नगरसेवकांचा होणार प्रवेश, पण नेमका कसा?




