Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहापालिका कर्मचारी बोनस निर्णयाच्या प्रतिक्षेत

महापालिका कर्मचारी बोनस निर्णयाच्या प्रतिक्षेत

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिला जाणार्‍या दिवाळी सानुग्रह अनुदानात गेल्या दोन तीन वर्षापासुन वाढ करण्यात आलेली नाही. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वानीच चांगल्या प्रकारे काम केले असल्याने महासभेत झालेल्या ठरावानुसार बोनस दिला जावा अशी प्रतिक्षा कर्मचार्‍यांना आहे. यासंदर्भात आता महापौर व प्रशासन बोनस कधी जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

- Advertisement -

महापालिकेतील कर्मचार्‍यांना गेल्या दोन वर्षापासुन दिवाळी बोनस चौदा हजार रुपये दिले जात आहे. यासंदर्भात ठराव झाल्यानंतर यानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येत नसल्याने कर्मचार्‍यांत नाराजीचा सुर आहे. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागाच्या कर्मचार्‍यांना चांगल्या प्रकारे करोना योद्धा म्हणुन सेवा बजावली आहे.

याची दखल अधिकार्‍यांनी घेतली आहे. यंदा महासभेने दिवाळी सानुग्रह अनुदानासंदर्भात ठराव गेल्या सप्टेंबर महिन्यात केला असुन यानुसार यंदाचा बोनस 20 हजार रु. मिळेल अशी अपेक्षा आहे.

मात्र म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेकडुन 25 हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, वैद्यकिय विभागातील मानधनावरील कर्मचारी, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण मंडळ, एनयुएलएम व इतर कर्मचार्‍यांना बोनस देण्याची मागणी म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेकडुन करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मंजुर ठरावानुसार बोनस द्यावी अशी मागणी अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी नुकतीच आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

आता दिवाळी दोन आठवड्यावर येऊन पोहचली असुन यासंदर्भात अद्यापही महापौरांनी बोनसचा निर्णय जाहीर केलेला नाही. यामुळे यंदा ठरावानुसार 20 हजार रु. बोनस देण्यात यावा अशी अपेक्षा महापालिकेतील अधिकारी – कर्मचार्‍यांची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या