Wednesday, February 19, 2025
HomeनाशिकNashik News : मनपा अतिक्रमण विभाग ॲक्टिव्ह मोडवर

Nashik News : मनपा अतिक्रमण विभाग ॲक्टिव्ह मोडवर

नियमित कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेचे आयुक्त (Commissioner of Nashik Municipal Corporation) म्हणून मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिकेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच महापालिकेचा अतिक्रमण विभागदेखील सध्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह मोडवर दिसत आहे. उपायुक्त डॉ. मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या शहरात चौफेर अतिक्रमण कारवाई सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisement -

मागच्या वर्षी विधानसभेच्या (Vidhansabha) पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी पुढाकार घेऊन शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेलचालकांवर कारवाई करत दणका दिला होता. यावेळी विशेष करून रूफ टॉप याच्यावर कारवाई करण्यात आली होती तर सध्या महापालिकेच्या मालकीच्या जागांसह ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेले आहे त्या ठिकाणी व शहरातील बाजारपेठांमध्ये अतिक्रमण विभागाच्या वतीने सतत कारवाई सुरू आहे.

गेल्या आठवडद्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे (Encroachment Department) ठिकठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. शुक्रवारी मनपाच्या मालकीच्या तिबेटियन मार्केट परिसरातील अनधिकृत वाढीव असलेले बांधकाम, फफ्थाचे शेड व हातगाडे यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. तर पश्चिम व पूर्व व सातपूर विभागात गुरुवारी धडक अतिक्रमण मोहीम राबवली आणि टपऱ्या, हातगाड्या जप्त केल्या.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त झगडे यांच्या आदेशान्वये उपायुक्त डॉ. मयूर पाटील व विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या उपस्थितीत संयुक्त मोहीम पश्चिम व पूर्व व सातपूर विभाग यांनी केली. तीन ट्रक साहित्य आङगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यांवरील व्यावसायिकांचे अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या