Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी मनपा सरसावली

Nashik News : शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी मनपा सरसावली

दीड हजार वाहने लावण्याची जागा मिळणार?

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने विकास होत असून सध्या शहराची लोकसंख्या (Population) २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे वाहन संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात पार्किंगची मोठी समस्या उद्भवली आहे. त्याचा निपटारा करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी अद्याप पार्किंगची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता महापालिका पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सरसावली असून मनपा शहरात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून एकाच वेळी सुमारे दोन हजार वाहने उभे राहतील अशी व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

- Advertisement -

नाशिक मनपा (Nashik NMC) पे अॅण्ड पार्क तत्त्वावर या जागा मक्तेदाराला देणार असल्याने मनपाच्या उत्पन्नातदेखील चांगली भर पडणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असून निधी नसल्याने विकासकामांसाठी (Development Works) हात आखडता घ्यावा लागत आहे. यापूर्वीच लेखा विभागाने कर वाढवा अथवा उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधा अन्यथा भविष्यात मनपाचा आर्थिक डोलारा कोसळू शकतो याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले होते. तर पंधराव्या वित्त आयोगानेही निधी हवा असेल तर उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याची सूचना दिली होती. त्यानंतर म हापालिकेला शहरात पार्किंगच्या माध्यमातून उत्पन्न मिळू शकते असे लक्षात आल्यावर वाहतूक सेलच्या माध्यमातून शहरात सात ठिकाणी पे अॅण्ड पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाहनांची क्षम ता वेगवेगळी असून एकूण १५०० वाहने एकाच वेळी पार्किंगमध्ये (Parking ) लावता येणार आहेत.यासाठी मनपा लवकरच निविदा काढणार आहे. नाशिक शहराचा विस्तार झाल्याने वाहनांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली असली तरी शहरातील मध्यवर्ती भागात वाहने लावण्याची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे नको त्या ठिकाणी वाहने लावल्यास पोलीस विभागाच्या वतीने टोईंग करून वाहन उचलण्यात येते. त्यामुळे मनपाकडून पार्किंगची सोय झाल्यास नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सात जागा

शहरात महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जागा आहेत. काही ठिकाणी तर अतिक्रमण केले गेले आहे. त्यांनादेखील मोकळे करण्याची कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान, मनपाकडून पहिल्या टप्प्यात सात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याच सात जागांसाठी मनपा आता निविदा काढणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जागा निश्चित करून त्यासाठी पुन्हा निविदा काढणार आहे.

पार्किंगची ठिकाणे

१) बी.डी. भालेकर शाळा,२) संदीप हॉटेलसमोर, मुंबई नाका, ३) भाजी मंडई, सातपूर, ४) नाशिक गावठाण, पंचवटी, ५) कॅनडा कॉर्नर, ६) शताब्दी हॉस्पिटल, मुंबईनाका, ७) नाशिक गावठाण.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...