Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनेते म्हणतात 'आघाडी' तर कार्यकर्त्यांची ‘स्वबळा’ची तुतारी

नेते म्हणतात ‘आघाडी’ तर कार्यकर्त्यांची ‘स्वबळा’ची तुतारी

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

आगामी महापालिका निवडणुकीला अवकाश असला तरी आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते भाजप विरुध्द एकीची मोट बांधत असताना स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र ‘स्वबळा’ची तुतारी फुंकत आहे.

- Advertisement -

नाशकात राष्ट्रवादीने ‘एकला चलो रे’ चा फटाका फोडला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व काँँग्रेसकडून त्याबाबत अद्याप प्रतिक्रिया येणे बाकी असून राष्ट्रवादीकडून ‘प्रेशर पॉलिटिक्स’चे कार्ड खेळले जात असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

मुंबई, नाशिक, पुणे यांसह डझनभर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे येत्या दीड वर्षांत फटाके फुटणार आहे. त्या अगोदर पुढिल काही महिन्यात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कोल्हापूर निवडणूक स्वतंत्र लढण्याचे राष्ट्रवादीने संकेत देत मएकला चलो रेफ चा नारा दिला आहे. त्या पाठोपाठ नाशिकमधेही तोच सूर पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बडया नेत्यांकडून भाजप विरोधात एकत्र येण्याची तयारी सुरु असताना स्थानिक पातळीवर मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वबळाचे लवंगी फटाके फोडले जात आहे. दुसरीकडे शिवसेना व काँँग्रेसमध्येपण पुढीलकाळात ‘म होऊन जाऊ द्या’असा सुर ऐकू आला तर नवल वाटता कामां नये. मात्र, नाशिक महापालिकेच्या इतिहासात डोकावले तर भाजपचा अपवाद वगळता मरामायणफवर एकहाती सत्तेचा झेंडा फडकविण्याची किमया एकाही पक्षाला जमली नाही.

122 संख्याबळ असलेल्या महापालिकेत भाजपने गतनिवडणुकीत 66 जागा जिकंत कमळ फुलवले. राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांना सत्तेत असूनही ही किमया घडवता आली नव्हती. तसेच राज ठाकरेंचा करिष्मा असुनही 2012 च्या निवडणुकीत 39 नगरसेवकांच्यापुढे इंजिन धावले नव्हते. शिवसेनेलाही आज पर्यंत स्वबळाचे शिवधनुष्य पेलता आले नाही.

गत निवडणुकीत मोदी फॅक्टर व राज्यात सत्ता यामुळे नाशिककरांनी महापालिकेत भाजपला भरभरुन मते दिली. त्यामुळे भाजपने स्वबळावर सत्ता आणली होती. यंदा देखील भाजपकडून स्वबळावर मैदानात शड्डू ठोकण्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे भाजपचा वारु रोखण्यासाठी एकत्र निवडणूक लढविण्याशिवाय महाविकास आघाडितील तिन्हि पक्षांना गत्यंतर नाही. असे असताना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याऐवजी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते स्वबळाचा नारा देत आहे. अर्थात ही प्रेशर डिप्लोमसीचा भाग असून स्वबळाचा फटाके पुढील काळात फुसके निघतील अशी शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या