Friday, April 24, 2026
HomeनाशिकNashik News : दुर्दैवी! लोखंडी गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा करुण...

Nashik News : दुर्दैवी! लोखंडी गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत

नाशिक | Nashik

शहरातील सहदेवनगरातील सोसायटीच्या (Society) पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कीतून ३ वर्षीय चिमुकला पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच ५ वर्षीय चिमुकल्याच्या (Children) अंगावर सोसायटीचा लोखंडी गेट पडल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अयनिश सचिन गवई (वय ५, रा. कृष्णा रेसिडेन्सी, गायकवाड नगर, जैन कॉलनी, मुंबईनाका, नाशिक) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सदर घटना शुक्रवारी (दि.२८) रोजी दुपारी १ वाजेदरम्यान घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अयनिश नेहमीप्रमाणे सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडला. त्यात तो गंभीर जखमी (Injured) झाला. ही बाब लक्षात येताच सचिन गवई व सोसायटीतील रहिवाशांनी अयनिशला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मयत घोषित केले.

दरम्यान, काही महिन्यांपासून गेटची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी सचिन गवई यांनी सोसायटील रहिवाशांना सांगितले होते. मात्र, रहिवाशांनी गेटच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यात अयनिशचा मृत्यू (Death) झाला. अयनिशच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील सचिन गवई हे कृष्णा रेसिडेन्सी सोसायटीचे सुरक्षारक्षक आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार विजय म्हैसधुणे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

0
नाशिक| जिमाका वृत्तसेवा Nashik ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’च्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात येणार असून,जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग वाढविणे आणि शाश्वत पाणी...