Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NCP News : 'आपल्या वहिनी आहेत ना!' राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी नाशिकमध्ये...

Nashik NCP News : ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी नाशिकमध्ये एकदिवसीय अधिवेशन; राज्यभरातील पदाधिकारी राहणार उपस्थित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पक्षाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये (Nashik) रविवारी (दि.२७) होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात होणाऱ्या या एकदिवसीय अधिवेशनासाठी राज्यभरातील सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या माध्यमातून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाची प्रतिमा अधिक ठळक करण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ हे नवे घोषवाक्य चर्चेत आले आहे.

- Advertisement -

या घोषवाक्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचा राज्यभर दौरा आणि पक्षसंघटनेशी संवाद वाढविण्याची रणनीती असल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांची पक्षाच्या नेतृत्वाच्या विविध जबाबदाऱ्यांवर निवड झाली असून, त्या सध्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री (Maharashtra DCM) आहेत. पक्षाच्या वाटचालीवरही लक्ष या अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीसह आगामी राजकीय रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षातील विविध नेत्यांमध्ये समन्वय, संघटन बळकटीकरण आणि पुढील काळातील कार्यक्रमांची दिशा याबाबत अधिवेशनात (NCP Convention) चर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.

नाशिकची निवड का?

अजित पवार यांचे नाशिकशी असलेले राजकीय संबंध आणि जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक उपस्थिती लक्षात घेता अधिवेशनासाठी नाशिकची निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. नाशिकला पक्षाचा बालेकिल्ला मानले जात असल्याने येथे अधिवेशनाच्या माध्यमातून संघटनेला नव्या पद्धतीने सक्रिय करण्याचा प्रयत्न असल्याचेही वृत्त आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली असून, राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या पहिल्याच मोठ्या राज्यस्तरीय अधिवेशनातून पक्षाची पुढील दिशा काय असेल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीवर बंदी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
नाशिक, दि. १५ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा...