Thursday, October 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमतदार नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

मतदार नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

१७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे; नागरिकांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन सुरू

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन आणि मदत करतील.

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल.मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Accident : पिकअपची दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon भरधाव पिकअप वाहनाने समोरून येत असलेल्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी व मुलगी असे तिघे जण गंभीररित्या जखमी होवून जागीच...