Wednesday, November 18, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 305 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3167 क्रेट्सची आवक झाली. नंबर 1 ला 201 ते 305 रुपये, नंबर 2 ला 101 ते 200 रुपये, नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये, नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. तसेच 41 क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली. त्यास सरासरी 7000 रुपये भाव मिळाला. एक क्विंटल मुगाची आवक झाली. त्यास 8801 रुपये भाव मिळाला. 2 क्विंटल गव्हाची आवक होवून सरासरी 2700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

संत्रीच्या 166 क्रेट्सची आवक झाली. त्याला 5 ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सीताफळाची 18 क्रेट्सची आवक झाली. त्यास 40 ते 90 रुपये तर सरासरी 75 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पेरूची 18 क्रेट्सची आवक झाली. त्यास सरासरी 55 रुपये किलोचा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित हॉटेल

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शिर्डी विमानतळ परिसरात उभारण्यात येणार्‍या पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि...