नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने शहरातील आडगाव परिसरातील स्वामी नारायण बँकवेट हॉल येथे आज (रविवारी) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याआधी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला असता विविध विषयांवर भाष्य केले.
राज्य सरकारने मुंबईत (Mumbai) मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखाली आंदोलनासाठी गेलेल्या मराठा समाजाच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या होत्या. यातील सरकारने मराठा समाजाची हैदराबाद गॅझेट लागू करण्याची महत्त्वाची मागणी केली. त्यामुळे सरकारमधील ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले असता उत्तर दिले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे आपला हात असल्याचा आरोप केला जात आहे, असा प्रश्न शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला. त्यावर बोलतांना पवार म्हणाले की,आमचा या आंदोलनाशी कवडीचाही सबंध नाही. त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नको”, असे त्यांनी म्हटले. तसेच सरकारने काढलेल्या जीआरवर बोलतांना ते म्हणाले, ‘अ ब क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. सरकार (Governmnet) कुठल्याही जातीधर्माचं नसावं, सरकार सर्वांचं आणि व्यापक असावं. सरकारने कोणतीही कमिटी एका जातीची न करता ती समाजाची करावी. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवं, त्यात अंतर नको”, असंही शरद पवार म्हणाले.
ठाकरेंच्या आंदोलनाची काढली हवा
पहलगाम हल्ल्यानंतर आज आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामाना होणार आहे. पंरतु, यावरून महाराष्ट्रात राजकरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याकडून आज ठिकठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. याबाबत शरद पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘भारत-पाकिस्तान मॅच हा एका दिवसाचा प्रश्न आहे, फार मोठा मुद्दा नाही. नंतर बघू, असे म्हणत उत्तर दिले. त्यामुळे शरद पवारांनी दिले ठाकरेंच्या वक्तव्याची एकप्रकारे हवा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भुजबळांना दिले रोखठोक उत्तर
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असे विधान केले होते. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, “एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही. आम्हाला व्यापक दृष्टीकोन पाहिजे. अंतर वाढेल असं भाष्य करणे योग्य नाही”, असे त्यांनी म्हटले.
मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरही बोलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे काल (शनिवारी) मणिपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यावर आज शरद पवारांना माध्यमांशी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ” मोदी मणिपूरला गेले, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच दिवसांपासून अशी मागणी होत होती”, असे त्यांनी सांगितले.





