नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्य शासनाने (State Government) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांचे यापूर्वीचे फिरते आरक्षण रद्द करत नव्याने आरक्षण प्रक्रिया (Reservation Process) राबवण्याचे आदेश दिले आहेत. आता २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित होणार आहे.
मात्र, असे असले तरी दुसरीकडे मात्र यासंदर्भातील माहिती आपल्या तर्कानुसार सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या नव्या प्रक्रियेमुळे येणारी निवडणूक आरक्षणाच्या दृष्टीने पहिलीच निवडणूक ठरणार आहे.त्यामुळे नेमके काय आरक्षण निघते याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
गटांची रचना अंतिम झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. नव्या चक्राकार पद्धतीऐवजी २०११ च्या जनगणनेनुसार जातनिहाय आकडेवारी ग्राह्य धरली जाणार असल्याने या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित तालुक्यांतील गट हे ‘ओबीसी’ किंवा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील.
कळवण, सुरगाण्यात ‘एसटी’चे प्राबल्य
कळवण आणि सुरगाणा हे तालुके ‘एसटी’ बहुल असून, येथील एकूण ८ गट राखीव राहतील. सुरगाणा तालुक्याची (Surgana Taluka) लोकसंख्या १ लाख ७५ हजारांवर असून, येथे ‘एसटी’ व्यतिरिक्त केवळ ५ ते १० हजार लोक आहेत. त्यामुळे येथील सर्व गट राखीव निघाले आहेत. दिंडोरीत ६ गट राखीव झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
गटांचे तपशील
एकूण गट – ७४ गट
अनुसूचित जमाती (एसटी) – २९ जागा राखीव
अनुसूचित जाती (एससी) – ५ जागा राखीव
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)- २० जागा
सर्वसाधारण प्रवर्ग – २० जागा (सर्व वर्गांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव)
‘एसटी’ राखीव गटांचा तालुकानिहाय अंदाज
‘एसटी’च्या लोकसंख्येच्या आधारे बागलाण, कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, चांदवड, नाशिक आणि मालेगाव तालुक्यांतील गट राखीव असतील.
तज्ज्ञांचा अंदाज
बागलाण : ३ गट (मानूर, ताहाराबाद, विरगाव)
कळवण : ४ गट (पुनमनगर, मानूर, कानाशी, अभोना)
सुरगाणा : ४ गट (उंबरठाण, श्रीभुवन, ठाणगाव, हातगड)
पेठ : २ गट (आंबे, कोहर)
दिंडोरी : ६ गट (अहिवंतवाडी, कसबे वणी, खेडगाव, कोचरगाव, उमराळे बुद्रुक, मोहाडी)
त्र्यंबकेश्वर : ३ गट (ठाणापाडा, हरसुल, अंजनेरी)
इगतपुरी : ४ गट (खंबाळे, वाडीवर्हे, नांदगावसदो, धामणगाव)
चांदवड : १ गट (वडनेर भैरव)
नाशिक : १ गट (गिरनारे)
मालेगाव : १ गट (खाकुर्डी)
‘एससी’ राखीव गट
अनुसूचित जाती (एससी) साठी ५ जागा राखीव
निफाड : २ गट
मालेगाव : २ गट
नाशिक : १ गट यापैकी तीन जागांवर महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळेल.





