Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : नाशिक महानगरपालिकेचे ३ हजार ५४ कोटींचे अंदाजपत्रक सादर

Nashik News : नाशिक महानगरपालिकेचे ३ हजार ५४ कोटींचे अंदाजपत्रक सादर

आता शहरातील एकही मालमत्ता कर विना राहणार नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेचे (Nashik NMC) आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ चे तब्बल ३ हजार ५४ कोटींचे अंदाजपत्रक (Budget) आज (दि.१६) रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी स्थायीवर सादर केले. किरकोळ कर वाढ करीत मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे पाचशे कोटींची वाढ यंदाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०२७ साली नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) सुमारे ४२५ कोटी तर टोकन साठी ५ कोटींची तरतूद करुन ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

- Advertisement -

मनपाला जीएसटी अनुदान, स्थानिक संस्था कर व १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार ८५ कोटी असे एकुण अंदाजे १५८३.४४ कोटी इतके उत्पन्न प्राप्त होईल. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचे अचूक व पूर्ण कर निर्धारण करण्यासाठी शहरातील कोणतीही मालमत्ता कर आकारणी विना राहु नये, यासाठी नाशिक शहरातील (Nashik City) मिळकतींचे जीपीएस मॅपिंगचे काम हाती घेतले असून २०२४-२५ या वित्तीय वर्षात २२१८६ मिळकतींना कर लावण्यात आलेले असून त्यानुसार उत्पन्नात ५०.८४ कोटींची वाढ झाली आहे.

तर मनपा स्वः उत्पन्न व शासनाकडे (Government) जमा करण्यात येणाऱ्या बाबींसहीत एकूण उत्पन्न करदात्यांना त्वरीत आत्याधुनिक पध्दतीने प्राप्त होण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराचे देयके, नोटीसा आता ई-मेल, व्हॉट्सपअ व मॅसेज व्दारे देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच ई-पेमेंटव्दारे कराचा ऑनलाईन (Online) भरणा केल्यास मालमत्ता करात १ टक्के अतिरिक्त सवलत जास्तीत जास्त ३ हजार रुपये पर्यंत देण्यात येते. २०२५-२६ वर्षासाठी सर्वसाधारण स्वच्छता कर व जल लाभ कर या करांच्या दरात प्रत्येकी १ टक्के वाढ सूचविण्यात आली असून, त्यापासून अंदाजे १० कोटी उत्पन्नात वाढ होणार आहे.

तसेच या वर्षापासून औद्योगिक कारखाने (Industrial Factories) मिळकतीचे मुल्यांकन दरात मिळकती करीता १.२० ऐवजी १.८० व छत पत्र्याचे मिळकती करीता १.०० ऐवजी रु.१.४० दर प्रती चौरस फुट प्रती मासिक याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. दरम्यान, मनपाच्या स्थायी समितीच्या सभागृहात अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदिप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, कर उपायुक्त अजित निकत आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...