नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहर व ग्रामिण भागात करोना प्रसार वेगाने होऊ लागला आहे. काल जिल्ह्य ७१ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये एकट्या नाशिक शहरातील ६१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १५८८ इतका झाला आहे.
करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात करोना नियंत्रणातयेत असताना नाशिक शहरात तसेच ग्रामिण भागात मात्र करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. तसेच मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. मृत्यूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ६४ मृत्यू मालेगाव येथे झाले आहेत. तर नाशिक शहरातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामिण भागातील ८ तर जिल्हाबाह्य ५ जण करोनामुळे मृत्यू झाले आहेत यामुळे मृत्यूचा आकडा ९७ झाला आहे.
वाढलेल्या रुग्णांमुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे. यामुळे नाशिक शहरातील रुग्णसंख्या ४२७ वर पोहोचली आहे. सध्या नाशिक शहरात २५९ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत १४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
सायंकाळी ६ वाजता आलेल्या १२ रुग्णांची हिस्ट्री अशी
१) फुले मार्केट कोकणीपूरा येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
२)त्रंबक दरवाजा,दूध बाजार, नाशिक येथील २७ वर्षीय युवती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे
.३) खतीब बंगलो दारुसलाम कॉलनी येथील २७ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याच कुटुंबातील २५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल आलेला आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
४) चक्रधर सोसायटी टाकळी रोड नाशिक येथील ३४ वर्षीय व्यक्ती, ८ वर्षीय मुलगी,५६ वर्षीय व २९ वर्षीय महिला हे सर्व एकाच कुटुंबातील असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
५) भाभा नगर, मुंबई नाका येथील २२ वर्षीय हा युवक ३१ मे २०२० रोजी अमेरिकेहून आलेला होता त्यास एका हॉटेल मध्ये कोरनटाईन करण्यात येऊन त्याचे स्वाब घेण्यात आले होते त्याचा अहवाल आज आला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
६) जयश्री निवास, गोविंद नगर नाशिक येथील ३९वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
७) पंचकृष्णा बंगलो, काठे मळा,टाकळी रोड येथील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
मयत रुग्णाची माहिती
१)पाटील पार्क,अंबड लिंक रोड येथील ४९ वर्षीय व्यक्तीला सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने दिनांक २६ मे २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाली होती त्याच्यावर उपचार सुरू असताना आज रविवार दि. ७ जून २०२० रोजी सकाळी ८ च्या सुमारास त्यांचे निधन झालेले आहे. हा रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरातील होता
२) बालाजी सदन,नागचौक,पंचवटी येथील ८५ वर्षाची महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता त्या महिलेवर उपचार सुरू असताना आज रविवार दि. ७ जून २०२० रोजी रात्री १२.३० च्या सुमारास निधन झालेले आहे.
दुसऱ्या अहवालातील ४९ रुग्णांची अशी आहे हिस्ट्री
१) जयदीप नगर, वडाळा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
२) नाईकवाडी पुरा येथील २२ वर्षीय युवती,३२ वर्षीय पुरुष ,११ वर्षीय मुलगा,४५ वर्षीय महिला,११वर्षीय मुलगा व १६ वर्षीय युवक यांचा कोरोना बाधीत अहवाल प्राप्त झालेला आहे.हे सर्वजण एकाच परिसरातील असून त्यातील काही जण एकाच कुटुंबातील आहेत व जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
३) दिंडोरी रोड मायको दवाखाना गल्ली नंबर ९ येथील जुन्या रुग्णांच्या संपर्कातील ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
४)भगवतीनगर हिरावाडी येथील एकाच कुटुंबातील २१ वर्षीय युवक व ३३ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.५)भराड वाडी पेठरोड येथील २० वर्षीय युवती व ६ महिन्यांची बालिका हे एकाच कुटुंबातील असून जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत त्यांचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
६)राजरत्न नगर सिडको येथील १६ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ७) राधिका निवास स्नेह नगर येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोना बाधित अहवाल प्राप्त झाला असून त्यात २५ व २३ वर्षीय युवतीसह ३ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
८)गुलशन कॉलनी पखाल रोड प्लॉट क्रमांक २१ एकाच परिसरातील रहिवासी असून त्यात ६९ वर्षे वृद्ध,६२ वर्षीय वृद्ध महिला,३८ वर्षीय पुरुष,३४ वर्षीय महिला,५३ वर्षीय वृद्ध महिला, २१ वर्षीय युवक १५ वर्षीय मुलगी, यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला आहे.हे सर्व जण जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
९)सिल्वर पार्क,काठे गल्ली गणेश नगर येथील ३२ वर्षीय महिला व १५ वर्षीय मुलगा हे एकाच कुटुंबातील असून ते कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
१०)राजरत्न नगर सिडको येथील ४० वर्षीय पुरुष याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.११) आनंद छाया बिल्डींग, आनंद छाया बस स्टॉप, सातपूर कॉलनी येथील ५४ वर्षीय महिला २५वर्षीय महिला हे एकाच परिवारातील असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर याच परिसरातील रहिवाशी ४८ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
१२) शिवशक्ती चौक सिडको येथील ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
१३) खोली क्रमांक ३५, जाधव संकुल, सातपूर येथील १६ वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
१४) घर नंबर ३७११, भगवान पुरा येथील ५८ वर्षीय वृद्धाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
१५) अशोका मार्ग येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
१६) नाईकवाडी पुरा, काझी चौक येथील ४८ वर्षीय व्यक्ती व २७ वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
१७) स्वस्तिक नगर पखाल रोड येथील ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.१८)घर नंबर ४६०८, नाईकवाडी पुरा,जुने नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिला,१८वर्षीय व २० वर्षीय युवक,३५ व ३२ वर्षीय महिला,३३वर्षीय पुरुष,३०वर्षीय महिला,१३ वर्षीय मुलगी,११ वर्षीय मुलगी, ३३वर्षीय महिला,३० वर्षीय व्यक्तीचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.




