Thursday, March 13, 2025
Homeनाशिकतयारी कुंभमेळ्याची! आपत्ती व्यवस्थापनाचा ७५ कोटींचा आराखडा

तयारी कुंभमेळ्याची! आपत्ती व्यवस्थापनाचा ७५ कोटींचा आराखडा

अरचनात्मक बाबींवर चर्चा

नाशिक | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाने (Disaster Management) ७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला असून, त्यात विविध विभागांच्या प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला (Nashik) तातडीच्या मदतीसाठी विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याने पूर्वीच्या नियोजनात बदल करावा लागणार असून, आता या प्रस्तावातील रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनावर (District Disaster Management) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरचनात्मक बाबींवर काम करण्यासाठी विविध विभागांद्वारे प्रस्ताव मागविण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील आस्थापनांचे ऑडिट करण्यात येत आहे. त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. या व्यवस्थापनात रचनात्मक व अरचनात्मक असे दोन प्रकार आहेत. त्यात रचनात्मक बाबींचे ११० प्रस्ताव अगोदरच सादर करण्यात आले.

त्यातील ९५ प्रकल्पांना राज्य शासनाने (State Government) मान्यता देत अधिसूचनाही जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अरचनात्मक बाबींवर काल जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अरचनात्मक बाबींवर विशेष चर्चा करण्यात आली. त्यात वृक्षारोपण तापमान कमी करण्यासांठी हरित छत तयार करणे, आयसी मटेरियल जनजागृती करणे, त्यासोबतच घातक टाकाऊ कचऱ्याचे धोके दूर करणे, पूल, जुने स्ट्रक्चर यांचा आढावा तपासणे यांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

दरम्यान, अरचनात्मक बाबींसाठी जिल्हा आपत्ती विभागाने १० ते १५ प्रस्ताव सादर केले आहेत. तर पोलिस व मनपाच्या (Police and NMC) माध्यमातून आणखी १० ते १५ प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे आदींसह पोलीस अधिकारी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...