Sunday, February 9, 2025
HomeनाशिकNashik News : अवैध गौण खनिज प्रकरणी १२१ जणांवर कारवाई

Nashik News : अवैध गौण खनिज प्रकरणी १२१ जणांवर कारवाई

१ कोटी १४ लाखांची दंडात्मक रक्कम वसूल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (District) अवैध गौणखनिज (Illegal Minor Minerals) वाहतूक व उत्खनाबाबत प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा घडाका गौणखनिज विभागाने महसूल विभागाच्या सहकाबनि राबवला आहे. अवैधपणे वाहतूक करणाऱ्या १२१ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ४९ वाहने जाम करण्यात आली आली आहेत.

- Advertisement -

अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खनाबाबत प्रशासनाकडून जिल्ह्याच्या १५ तालुक्यांत भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाई (Action) करण्यात येत आहेत. १ एप्रिल २०२४ ते १८ जानेवारी या कालबाधीत जिल्ह्यात १२१ जणांबर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहेत, अवैधपणे बाहतूक करणाऱ्या १२१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ४९ वाहने जप्त करण्यात आली आली आहेत. तर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६३९ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी १ कोटी १४ लाख ३२ हजार ८६९ रूपयांची दंडात्मक रकमेची वसुली प्रशासनाने केली आहे.

गेल्या दहा महिन्यात झालेल्या १२१ कारवायांमध्ये सर्वाधिक २१ कारवाया या बागलाण तालुक्यात (Baglan Taluka) करण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल १७ कारवाया निफाड तालुक्यात (Niphad Taluka) करण्यात करण्यात आल्या, १४ कारवाया दिंडोरी तालुक्यात करण्यात आल्या आहेत. पेठमध्ये १२, कळवणमध्ये ११, इगतपुरी ९, सिन्नर व मालेगावमध्ये प्रत्येकी ८, देवळामध्ये ६, पेठ, त्र्यंबकेश्वर, केवला, सुरगाणामध्ये ३ तर नांदगावमध्ये २ आणि सर्वात कमी चांदवड तालुक्यात १ कारवाई करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे आगामी काळातही अवैध गौण खनिजबाचतीत अशाच कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाच्यातीने देण्यात आला आहे.

अवैधरित्या गौणख निजांची तस्करी करणा-यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहेत. अवैधरित्या गौग खनिजांसंबंधी प्रकरणांना चाप बसवण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथक कार्यरत करण्यात आले आहेत.

अमोल निकम, जिल्हा गौणखनिज अधिकारी, प्रभारी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या