Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik News : ई-चलानअंतर्गत आठ वर्षांत साडेआठ लाख वाहनधारकांवर कारवाई

Nashik News : ई-चलानअंतर्गत आठ वर्षांत साडेआठ लाख वाहनधारकांवर कारवाई

पाच कोटी रुपये थकीत!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात वाहतूक सुरक्षेच्या (Traffic Safety) विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण साडेआठ लाख बेशिस्त वाहन चालकांना तब्बल ३२ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, याच रकमेतील तब्बल पाच काेटी रुपयांचा दंड (Fine) अद्याप थकित आहे. त्यामुळे एकीकडे कारवाईचा धडाका सुरु असताना दंडाच्या थकित रकमेचा फुगवटा वाढताे आहे.

- Advertisement -

शहरात नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) अंतर्गत ई-चलान कारवाईच्या पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी सुरू असून, दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मिळते. त्यानंतर सोळाव्या दिवशी पोलिसांमार्फत (Police) चलानची नोंद थेट कोर्टात होते. थकीत दंडातील ३२ पैकी २७ कोटी रुपये वसूल झाले असून, उर्वरित ५ कोटींच्या वसुलीकरीता लोकअदालतीत दाव्यांवर कामकाज सुरू आहे.

त्यानुसार ६ लाख ८ हजार ५२९ वाहन चालकांकडून २७ कोटी १६ लाख ४८ हजार ८५४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर २ लाख १८ हजार ५२० वाहन चालकांचा ५ कोटी ४४ लाख ३३ हजार ४४७ रुपयांचा दंड थकीत असून, संबंधित प्रकरणे वसुलीकरीता न्यायालयात (Court) सादर झाली आहेत.आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलिसांनी वाहतूक सुरक्षेवर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे.

दरम्यान, पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड या पूर्वीच्या वाहतूक पथकांसोबत शहरातील प्रमुख ठिकाणची कोंडी फोडण्यासाठी द्वारका पथक, सातपूर आणि एक्स्लो पॉइंट हे तीन विशेष पथक नियुक्त केले आहे. त्यानुसार शहरात सध्या सात पथके कार्यरत आहेत. चालकांना दंड ठोठविण्यासह वाहतूक सुरक्षेवर भर दिला जात आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहाय्यक आयुक्त सुधाकर सुराडकर यांनी सातही पथकांच्या प्रभारींसह अंमलदारांना दंड वसुलीपेक्षा चालकांना शिस्त लावण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सन कारवाई थकीत दंड (रुपये)
२०१७ १९९ ०१,०६, २००
२०१८ १,८३२ १०,६०, ०००
२०१९ ६,४४४ ३८,३४,६००
२०२० १०,००७ ४३,२४,७००
२०२१ ७,७७१ ३९,६९,५५०
२०२२ ६,९८६ ७८,३९,१००
२०२३ २०,२५२ ०१,३०, ७०,८५०
२०२४ १,६४,९९९ २,०२, २८, ४४७
एकूण २,१८,५२८ ५,४४,३३,४४७

ताज्या बातम्या

Surgana Rain News : सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस; पुरात वाहून गेल्याने...

0
सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana तालुक्यात बुधवारी (दि. २२ जुलै) रोजी दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसानंतर रात्री सात वाजेच्या सुमारास धुव्वाधार पावसाने (Rain) जोरदार हजेरी...