Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : अखेर कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक; नाशिक मनपाच्या आयुक्तपदी मनीषा खत्रींची...

Nashik News : अखेर कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक; नाशिक मनपाच्या आयुक्तपदी मनीषा खत्रींची नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील काही दिवसांपासून नाशिक महापालिकेचे आयुक्त (Commissioner of Nashik Municipal Corporation) डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांची बदली होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. अखेर दोन दिवसांपूर्वी यावर शिक्कामोर्तब होऊन त्यांच्याजागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Rahul kardile) यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.मात्र, कर्डिले यांच्या नियुक्तीवरून भाजपचा एक बडा मंत्री नाराज झाला होता. त्यामुळे कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक लागणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

भाजपचा बडा मंत्री नाराज झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कर्डिले यांच्या नाशिकच्या आयुक्तपदावरील नियुक्तीला तोंडी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यामुळे राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळण्याची शक्यता धूसर होती. अखेर ती शक्यता खरी ठरली असून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशी ऑर्डर देखील सरकारकडून निघाली आहे.

दरम्यान, राहुल कर्डिले यांची नियुक्ती होण्याआधी नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर हे (दि.३१ डिसेंबर २०२४) पर्यंत वैद्यकीय रजेवर असल्यामुळे शासनाने आयुक्तपदाचा प्रभारी पदभार एनएमआरडीच्या आयुक्त असलेल्या मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्याकडे सोपविण्यात आल्याची ऑर्डर काढली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच राहुल कर्डिले यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे भाजपचा हा बडा मंत्री नाराज झाला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्याच्या नाराजीची दखल घेत आता नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...