नाशिक | Nashik
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तावेज व फसवणुकीप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ठोठावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी कायम ठेवली. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तसेच त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आले होते. यानंतर माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळ-राठोड यांनी नाशिक न्यायालयात मंत्री कोकाटे यांच्या अटकेसंदर्भात आज (बुधवारी) अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : दुसऱ्यांदा मंत्रिपद धोक्यात आल्यानंतर कोकाटे अजितदादांना भेटणार; काय निर्णय होणार?
मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक सत्र न्यायालयाकडून (Nashik Court) अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता असून, त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. माणिकराव कोकाटे यांनी त्वरीत पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो कोणी मंत्री असो किंवा अन्य कोणीही , असे न्यायालयाने निर्णय देतांना म्हटले आहे.
हे देखील वाचा : Manikrao Kokate : मंत्री कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा; ‘वर्षा’वरील भेटीत CM फडणवीसांचा अजितदादांना थेट सवाल
दरम्यान, आजच्या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली. परंतु, कोकाटे यांनी तशी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नसल्याचे यावेळी कोर्टात समोर आले. तर त्यांना शरण येण्यासाठी चार दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी कोकाटे यांच्या वकिलांनी केली. याशिवाय माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष राठोड यांनी केला.
नेमकं काय आहे प्रकरण?
कॉलेज रोडच्या येवलेकर मळा परिसरातील दूध संघानजिकच्या इमारतीमध्ये शासनाच्या १० टक्के योजनेतील सदनिका मिळविण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी कमी उत्पन्नासंदर्भातील कागदपत्रे सादर केले आणि सदनिका मिळविली होती. यासंदर्भात तत्कालीन माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर आरोप केले होते. याप्रकरणी १२ डिसेंबर १९९५ रोजी सरकारवाडा पोलिसात तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीनुसार कोकाटे बंधुंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून सरकारवाडा पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायधीश रुपाली नरवाडिया यांनी या खटल्यासंदर्भात २० फेब्रुवारी २०२५ रोजी मंत्री कोकाटे व विजय कोकाटे यांच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला होता.




