Saturday, February 8, 2025
HomeनाशिकNashik News : मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या नजरा २५ फेब्रुवारीकडे

Nashik News : मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या नजरा २५ फेब्रुवारीकडे

आदेश मिळताच प्रशासन लागणार कामाला

नाशिक | फारुख पठाण | Nashik

राज्यातील मुंबई महापालिकेसह (Mumbai NMC) सुमारे २३ मनपा तसेच जिल्हा परिषदांच्या (Zilla Parishad) निवडणुका रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) इतर काही मुद्द्यांवर याचिका दाखल असल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा होत नाही. दरम्यान, येत्या २५ फेब्रवारी रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या नजरा लागल्या आहे.

- Advertisement -

दरम्यान, शासनाकडून आदेश मिळाल्यावर त्वरित मनपा प्रशासन निवडणूक (Municipality Administration Election) कामाला सुरुवात करणार आहे. सुमारे पावणे तीन वर्षापासून पुढे ढकललेली महापालिका निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या सुनावणीकडे नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. सुमारे पावणे तीन वर्षापासून संबम धरून बसलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणुका होत नसल्याने अस्वस्थता दिसत आहे.

महापालिकेतील अधिकार नसल्याने प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेवकांना (Corporators) अनंत अडवणी येत आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक कधी लागते, याकडे सा-यांचे लक्ष लागून आहे. २५ ला सुनावणी झाल्यावर मनपा निवडणुका होणार की आणखी पुढे लांबणार हे त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक महापालिकांसह इतर ठिकाणच्या निवडणुका प्रलंचित असून, तीन वर्षापासून पालिकेत प्रशासक राजवट आहे.

प्रशासक राजवटीत नागरिकांचे प्रश्न सुटले जात नसल्याची ओरड आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका (Local Body Election) लांबल्या असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातल्या याचिकेवर काय सुनावणी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संयम सुटत आहे

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक मागील दोन वर्षांपासून विविध प्रकारे लोकांमध्ये जाऊन आपला जनसंपर्क वाढवत आहे. मात्र, निवडणुका सतत पुढे जात असल्यामुळे त्याचा देखील संयम कुठेतरी सुटत असल्याचे दिसून येत आहे. तरी येत्या २५ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीकडे सायांचे लक्ष लागले आहे.

नवीन मतदार यादी होणार

मनपा निवडणुकांबद्दल शासनाकडून आदेश आल्यावर नाशिक महापालिकेला नव्याने मतदार यादी तयार करावी लागणार आहे. कारण यापूर्वी २०२२ साली मध्ये मतदार यादी अंतिम झाली होती, मात्र त्यानंतर निवडणुका न झाल्यामुळे ती यादी आता होणान्या निवडणुकीसाठी उपयोगी ठरणार नाही. कारण त्यानंतर लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून त्यात मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शासनाकडून आदेश मिळाल्यावर शासन जो दिनांक देईल त्या दिनांकापर्यंतचे विधानसभा निहाय मतदार यादी महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासनाकडून खरेदी करणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या